जिल्हा परिषद हायस्कुल पाथरी चे पावसाने बेहाल

जिल्हा परिषद हायस्कुल पाथरी चे पावसाने बेहाल
        विध्यार्थ्यांना सहन करावा लागतो आहे नाहक त्रास
पाथरी (वार्ताहर)
         पाथरी हे परिसरातील मोठे नगर आहे. पाथरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय. अमरदीप कान्वेंट  तसेच शासनाची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच जिल्हा परिषद हायस्कुल आहे. परिसरातील जनता आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात इथे येतात आरोग्याच्या सुविधेला आधीच इथे ग्रहण लागले आहेत वारंवार सूचना करून सुद्धा या विषयाकडे कुणीच गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. आत्ता पावसाळा सुरु झालेला आहे. आणि त्यात जिल्हा परिषद हायस्कुल शाळेच्या इमारतीची दशा झालेली आहे. या परिसरातील विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात या शाळेमध्ये शिक्षण घेण्याकरिता येतात.पावसामुळे चक्क वर्गखोल्या गळायला लागल्या आहेत विद्यार्थ्यांना बसायला मोठी अडचण निर्माण झालेली आहे. बिचारे चिमुकले गरीब विद्यार्थी शाळेत बसून शिक्षणाची जिद्द असल्यामुळे कसेबसे शिक्षण घेत आहे. मानवी जीवन सुंदर आणि प्रगतशील जगण्यासाठी शिक्षण हा मूलभूत पाया आहे. त्याकडेच जर दुर्लक्ष होत असेल तर प्रगती होईल का हा प्रश्न आहे. एकीकडे शासन मोठमोठया इमारती उभारून त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. आणि जिथे खरी गरज आहे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या प्रश्नाकडे राजकीय पुढार्यांनी लक्ष देऊन समस्या मार्गी लावाव्यात अशी अपेक्ष आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!