स्वातंत्र्य लढ्यासाठी आदिवासी नेत्यांचा फार मोठे योगदान
स्वातंत्र्य लढ्यासाठी आदिवासी नेत्यांचा फार मोठे योगदान
माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन
आदिवासी संस्कृती जोपासणे आपले आद्यकर्तव्य
बोलेपल्ली येथे भव्य जागतिक आदिवासी दिन साजरा
मूलचेरा (सेवा पवार)
भारतीय स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक आदिवासी नेत्यांचा फार मोठे योगदान असून आदिवासी संस्कृती व अस्मिता जोपासणे आपले आद्यकर्तव्य असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते मूलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली येथे 9 आगष्ट जागतिक आदिवासी दिनी उदघाटनीय स्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मस्तारी माझो झोरे होते तर विशेष अतिथी म्हणून माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान बांधकाम सभापती #भाग्यश्री ताई आत्राम होते, युवा नेते #ऋतुराज हलगेकर, शाहीन हकीम तर प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर जि.प.सदस्य ऋषी पोरतेट, बबलू भैय्या हकीम, ग्रा.पं.सदस्य कैलास कोरेत, शिवाजी नरोटे, सुरेश मटामी, उपसरपंच शंकर आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
उदघाटनीय स्थानावरून पुढे बोलतांना माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक आदिवासी नेत्यांनी गुलामीला झुगारून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले आणि समाजासाठी आपले सर्वस्वी अर्पण केले आदिवासी थोर नेत्यांची प्रेरणा घेऊन त्या दिशेने वाटचाल करणे अत्यावश्यक असल्याचे सांगून, आदीवासी हे देशाचे मूळनिवासी असले तरी आज समाजाची वाताहात व दशा होत आहे यासाठी आपणच कारणीभूत असून समाजाला खरी दिशा देण्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज असून आता आदिवासी जनतेनी जागृत व संघटित राहणे ही काळाची गरज बनल्याचे आवर्जून सांगितले.
तसेच शासन आदिवासी व दलित समाजाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम व मोठी निधी उपलब्ध करून देत असले तरी मागील दहा वर्षांपासून सक्षम, अनुभवी व कणखर नेतृत्व अभावी आदिवासी बहुल भाग असूनही आपण विकासापासून कोसो दूर गेलो आणि सोबतच आदिवासी संस्कृती, रीतिरिवाज,परंपराही लोप पावत असून आता समाजाने जागृती दाखवून आदिवासी समाजाची अस्मिता जपण्यासाठी निर्भीडपणे पुढे यावे असे आवाहनही यावेळी माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
तत्पूर्वी गोटूल भवनाच्या प्रांगणात जागतिक आदिवासी दिनानिमित्य सप्तरंगी झेंडा पांडुमचे माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जि.प.सदस्य ऋषी पोरतेट, कैलास कोरेत, फकिरा धुर्वा आदींनी आपले विचार प्रकट केले. सूत्रसंचालन व आभार मारोतो पलो यांनी केले. यावेळी बोलेपल्ली व परिसरातील समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!