चांपा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासींनी दिला एकतेचा संदेश
चांपा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासींनी दिला एकतेचा संदेश
चांप्यात चिमुकल्यांच्या वेशभूषेतुन झळकली संस्कृती
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
जेथे जंगल, तेथे आदिवासी' या समीकरणातुन आदिवासी प्रत्येक वस्तूला दैवत मानतात, निसर्गावर त्यांची निसर्गातील निस्सीम श्रध्दा आहे.२३डिसेंबर १९९४रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेने मंजूर केलेल्या ठरवाद्वारे ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासींचा दिन म्हणून घोषित करण्यात आला .त्याअनुषंगाने चांपा येथे जागतिक आदिवासी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त चांपा येथे आदिवासी समुदायातील गोंड, पारधी, गोवारी, माना, कौल सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. रैलीत चिमुकल्यांनी पारधी समाजातील समशेर सिंग पारधी, गोंड समाजातील भगवान बिरसा व बापूराव शेडमाके, माना समाजातील रानी दुर्गावती यांची वेशभूषा केली. व सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यातून आदिवासीं बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिति दर्शवली .जिल्हयातच नव्हे, तर संपुर्ण राज्यात आदिवासी ऐकतेचा संदेश देण्यात आला. रैलीला नागपुर जिल्हापरिषद च्या महिला बालकल्याण सभापती पुष्पाताई वाघाडे, चांप्याचे सरपंच अतिश पवार यांनी रैलीला हिरवी झेंडी दाखवली व रॅलीला आदिवासी स्मारकापासून सुरवात झाली.डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केल्यानंतर गावातील संपूर्ण परिसरातुन भ्रमण करून आदिवासी स्मारक येथे समारोप झाला यावेळी बिरसा मुंडा आदिवासी कल्याण समिती तर्फे रैलीचे आयोजन करण्यात आले .व समारोप नंतर आदिवासी बांधवांना महाप्रसाद देण्यात आला. आदिवासी रैलीला यशस्वीकरण्याकरिता आदिवासी युवा सेनेचे कार्यकर्ते व सकाळ तनिष्का गटातील महिलांनी परिश्रमाने रैलीचे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले. कार्यक्रम दरम्यान दुचाकीची रैली काढण्यात आली. आदिवासी रैलीचे नेतृत्व बिरसा मुंडा आदिवासी कल्याण समिती चांपाचे सरपंच अतिश पवार अजय सिरसाम, अनिल पवार, मारूती वरठी, लालचंद पवार , संजय पवार , ईश्वर इरपाते, सुरेश मसराम, हरिदास नारनवरे, गुलाब मसराम, दिगंबर घरत, राघो कन्नके, आदिवासी युवा सेना शिवशंकर राजपूत, संदीप नेहारे, सुरेंद्र नेवारे, कृष्णा इरपाते, उत्तर बागडे. आशिष तोडासे, अमित इरपाते, रितेश मरष्कोले, कोमल वाढवे सुमीत वाढवे व सकाळ तनिष्का महिला गटातील मीराबाई मसराम, अर्चना सिरसाम, वैशाली वरठी, अनिता खंडाळे, शिल्पा इरपाते. आदी हजारोंच्या संख्येत आदिवासी बांधव उपस्थितीत जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!