नळ योजनेला अखेरची घरघर!

पो भू र्ण (विजय ढोंगे) पालकमंत्र्यांच्या प्रिय  गावात पाण्यासाठी वणवण-आजारी नळयोजनेला अखेरची घरघर असून आरो मशिनचा निवळ देखा वा आहे.

       या विभागाचे आमदार तथा राज्याचे अर्थ व नियोजन आणि वनमंत्री नामदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांना अधिक प्रिय असलेल्या जुनगाव ये पिण्याच्या पाण्याची सततची समस्या झाली आहे.आधीच आजारी असलेल्या नळ योजनेला अखेरची घरघर लागली असल्याचे चित्र आहे.
  
गावातील ग्रामस्थांवर पेयजल योजनेच्या निकृष्ट कामामुळे ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे, ग्रामस्थांना दुषित पाणी प्यावे लागत आहे.पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव या गावासाठी २५वर्षापुर्वी  ही नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली तेव्हापासूनच पाणी पुरवठा योजना आजारी  असल्याने संपूर्ण गावाला भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.

 महिलांना दुरवरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे.तर अनेक जन नदीचे पाणी आनुन पित आहेत. शुद्ध पाणी मिळत नसल्याने पावसाळ्यात आरोग्याचे प्रश्नही उद्भवण्याची शक्यता आहे. परंतु, सर्वसामान्यांशी निगडीत या प्रश्नांकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी डोळेझाक करण्याची भूमिका घेतल्याची ग्रामस्थांची भावना आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!