आदर्श गावाकडे एस टी महामंडळाची पाठ.

पो म्भू र्ण:-( विजय ढोंगे)जुनगाव "आदर्श"गावाकडे  एसटी महामंडळाची पाठ
दोन्ही  बसेस बंद केल्याने विद्यार्थी व प्रवाशांचे हाल : नियोजन कोलमडलेले

  पोंभुर्णा तालुक्यातील आदर्श जुनगाव येथे येणाऱ्या दोन्ही बसेस बंद केल्याने या मार्गावरील प्रवाशांसह विद्यार्थ्यांची परवळ होत आहे.पोंभुर्णा ते जुनगाव आणि चंद्रपूर-जुनगाव अशा दोन बसेस येथे सुरु होत्या.परंतु  एसटी महामंडळाने जुनगाव कडे पाठ फिरवली असून गेल्या विस दिवसांपासुन  बसेस बंद आहेत. त्यामुळे येथील प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत. तरी एसटीच्या फेऱ्या पुर्ववत सुरु कराव्यात , अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

 या विभागाचे आमदार राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री नाम.सुधिरभाऊ मुनगंटीवार हे नेतृत्व करीत असल्यामुळे  तालुक्‍यात एसटीची  सोय उत्तम मिळणार या आशेने प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु तसे न होता उलट जुनगाव येथिल  एसटीच्या  बसेस बंद झाल्या आहेत. 
 
जुनगाव कडे सकाळीआठ वाजता  येणारी चंद्रपूर  ते जुनगाव बस बंद झाल्याने  प्रशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्याचे मोठे हाल होत आहेत. या बसवर तालुक्‍यात सर्व प्रशासकीय कार्यालयातील कर्मचारी, आयटी आय मधील विद्यार्थी आणि तालुक्‍यातील विद्यार्थी, शिक्षक, बॅंकांचे कर्मचारी अवलंबुन आहेत;परंतु ही बस नेहमीच रद्द होत असल्याने येथील प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत. येथुन नियमित प्रवास करणारे कामगार, विद्यार्थी यांचे देखील हाल होत आहेत. ही बस पुन्हा सुरु करावी अशी मागणी वेळोवेळी करुन देखील एसटीमहामंडळ ही बस सुरु करण्यास उदासीन आहे.

  बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी प्रवाशांनी व  माजी सरपंच जिवनदास गेडाम  यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!