स्वच्छतेतुन शहिदांच्या आठवणींना उजाळा पुरातन प्रेमी चिमुर यांचा पुढाकार

स्वच्छतेतुन शहिदांच्या आठवणींना उजाळा

पुरातन प्रेमी चिमुर यांचा पुढाकार



पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - भारत देशात चिमुरची क्रांती प्रसिद्ध आहे. महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना  १९४२ला" चले जाव"चा नारा दिला. त्याचे पडसाद चिमुर मध्ये पडले. शहिदांच्या आठवणींना उजाळा मिळावा,  शुर विर शहिदापासुन चिमुर वासियांना प्रेरणा मिळावी व शहीदाचे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी पुरातन प्रेमी दरवर्षी चिमुर-- वरोरा मुख्य मार्गावर असलेल्या लोखंडी पुलाला स्वच्छतेतुन क्रांती विर शहिदांच्या बलिदानाला उजाळा देत असतात. चिमुर क्रांती चा इतिहास पुसला जाऊ नये  व पुल बघून शहिदांची आठवण व्हावी यासाठी पुरातन प्रेमी स्वच्छतेतुन सलामी देत असतात.ज्या रक्त रंजित लोखंडी पुलावर ब्रिटिश अधिका-यांशी लढा देत क्रांतीकारक धारार्थी पडले, ब्रिटिश अधिका-यांना हाकलुन लावले आणी आपल्या छातीवर गोळ्या घेतल्या अशा चिमुर क्रांती चा मुक साक्षीदार असलेल्या लोखंडी पुलाला स्वच्छतेतुन शहिदांच्या बलिदानाला पुरातन प्रेमी कडून उजाळा देण्यात आला. दरवर्षी याच पुलावर १६ आॅगस्ट ला सुशोभित करुन शहिदांना सलामी दिली जाते. 

यावेळी पुरातन प्रेमी कवडू लोहकरे,  निखिल भालेराव, क्रिष्णा मसराम, ऋषिकेश बाहूरे, संदिप किटे, समिर बंडे, पंकज बंडे, मोहन सातपैसे, आशिष ईखारे, गोपाल मासुरकर, आदि  सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!