धान पऱ्याला अतिवृष्टी चा फटका
धान पऱ्याला अतिवृष्टी चा फटका
जांभुळघाट - प्रतिनीधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमूर तालुक्यातील नेरी येथील शेतकरी श्री गुलाब श्रावनजी पिसे यांची धाणारी शेती कटारा (रिठ) येथे आहे.
शेतीचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्याने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित र. नं. ६५६ नेरी येथून रुपये एक लाखाचे पीक कर्ज उचलले आहे.
शेताला लागून असलेल्या नाल्यातील पाणी बांध्यामध्ये ५ ते ७ फूट पाणी सलग १० ते १२ दिवस साचून होता. नाल्यातील पाण्यासोबत वाहून आलेल्या गाळाने शेतजमीन खराब झाली आहे. सततच्या पावसामुळे सदर शेतकऱ्याच्या शेतातील धानाचे पऱ्हे पूर्णतः सडून गेलेले आहे. आतापर्यंत मशागतीच्या कामासाठी सुमारे १,५००००/- रुपये खर्च आला आहे. त्यामुळे सदर शेतकरी हा मशागतीच्या खर्चाच्या बोज्यामुळे व कर्जाऊ रक्कम या दोन्ही बाबीमुळे पूर्णतः खचून गेलेला आहे. सदर शेतकऱ्याला धानाच्या शेतीशिवाय उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन उपलब्ध नसून २ मुले, पत्नी व स्वतः यांची शेतीवरच गुजराण सुरू आहे.
त्यामुळे श्री गुलाब पिसे यांनी आपल्या शेतातील सातही धान परह्याची मोक्का चौकशी करून पंचनामा अहवाल शासनाकडे सादर करण्यात यावे, यासाठी मागणी केली आहे. हीच परीस्थीती चिमुर तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्याची झाली आहे. प्रशासनाने तात्काल लक्ष दयावे,मोक्का चौकशी करून पंचनामा अहवाल शासनाकडे सादर करण्यात यावे,अशी चिमुर तालूक्यातील शेतकऱ्यांनी मांगणी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!