देशी दारू जप्त, आरोपीला अटक
देशी दारू जप्त, आरोपीला अटक
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
शंकरपूर पोलीस चौकी अंतर्गत अवैध रित्या दारूची साठवणूक करून विकताना करताना एका आरोपीला अटक करण्यात आली ही कारवाही दीं १२ ऑगस्ट ला दुपारी करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शंकरपूर येथील रहिवासी असलेलले देवानंद गायकवाड हे अवैध रित्या दारूची साठवणूक करून विकत असल्याची गुप्त माहिती Shankarpur येथील पोलिस उपनरीक्षक नरेंद्र तायडे याना मिळाली त्या आधारावर आरोपीच्या घराची झडती घेतली असता नऊ हजार सहाशे रुपये किमतीच्या ९६ देशी दारूच्या निपा जप्त केल्या आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई थानेदार,मनोज गभने यांचे मार्ग दर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र तायडे,जंगम पोलीस हवालदार रामटेके, लोटकर, उराडे नागरगोचीवर यांनी केली...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!