नागरिकांनी श्रमदान करून बुजविले रस्त्यावरील खड्डे
वॉर्ड नं. १४ च्या नागरिकांनी श्रमदान करून बुजविले रस्त्यावरील खड्डे
मूल (अमित राऊत)
मूल शहरातील वार्ड नं.१४ येथे बालविकास शाळेच्या मागिल रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरीकांना ये-जा करण्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी परीस्थीती निर्माण झाली आहे. वार्ड नं. १४ येथिल रहिवासी नागरीकांनी तेथिल नगरसेवकांना सांगितले मात्र नगरसेवकाने लक्ष दिले नसल्याचे नागरीकांनी सांगितले. अखेर नगरसेकाने नागरीकांच्या समस्यांची दखल न घेतल्याने नागरीकांनी पुढाकार घेत एकत्र येऊन स्वता श्रमदानातुन मेहनत घेतली व खड्डे भुजवण्याचा काम केला. नगरसेवक महेंद्र करकाडे ते संतोष चिताडे यांच्या घरापर्यंत अनेक खड्डे मुख्य रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच काही भागात नाल्या खोदले परंतु ते पुर्ण केले नाहीत. सुशांत अरगेलवार यांच्या घराजवळ मोठा नाला आहे. त्या परीसरात लहान मुले खेळत असतात त्यामुळे तेथे कधी अपघात होईल याची शक्यता नाकारता येत नाही. अशा विविध समस्या तेथील नागरीकांनी सांगितले.
विविध समस्या असलेल्या या वार्डात प्रशासनाने लक्ष देऊन समस्या सोडवाव्या अशी मागणी होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!