ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाच्या वतीने सुधाकर गाडेवार सन्मानित

ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाच्या वतीने सुधाकर गाडेवार सन्मानित 


सावली (प्रतिनिधी) -  अ.भा.श्रीगुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रम द्वारा संचालित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाच्या वतीने सुधाकर गाडेवार गुरूजी यांना सन्मानित करण्यात आले आहे.  गेल्या सत्रात राष्ट्रसंत साहित्य आणि ग्रामगीता वर आधारित ही परीक्षा सावली तालुक्यात ४१ शाळेच्या केंद्रावर घेण्यात आली  आणि त्यात तालुक्यातून १८८०  विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते . ७८ वर्षीय  सुधाकरजी गाडेवार  हे व्यवसायाने पुर्वी जि.प.शाळेचे मुख्याद्यापक होते . त्यांच्याच पुढाकारातून ही परीक्षा वेगवेगळ्या केंद्रावर घेतली जाते.  ते ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाचे सावली तालुकाप्रमुख असून महात्मा गांधी विचार मंच चे अध्यक्ष आहे. गांधी विचार , खादीचा प्रचार प्रसार करण्याबरोबरच गेल्या अनेक वर्षापासून परीक्षा विभागाचे कार्य करीत आहे.  परीक्षा समितीच्या वतीने सुधाकर गाडेवार यांना  श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या सामुदायिक प्रार्थना मंदिरात ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे हस्ते गौरवचिन्ह , सन्मानपत्र ,ग्रामगीता देऊन सन्मानित करण्यात आले .याप्रसंगी श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे रत्नाकर येनगंदेवार , सुधाकर गुंतीवार, शंकर बल्लमवार , सुरेश आकुलवार , गोलुजी भेंडारे ,  तुलसिदास कोसरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती . सावली ह्या तालुक्याच्या ठिकाणी महात्मा गांधी १९३६ आणि  १९३९ साली आले होते. त्यांच्याच हस्ते सर्व सेवा संघाची स्थापना करण्यात आली होती. अश्या ऐतिहासिक गावातून सातत्याने निष्काम भावनेने राष्ट्रसंताच्या विचारांचा प्रचार प्रसाराचे कार्य  गाडेवारजी स्वयंस्फुर्तीने करीत असून ते कौतुकास्पद असल्याचे मनोगत  बंडोपंत बोढेकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!