चिमूर नगर परिषदचे चार नगरसेवक अपात्र
चिमूर नगर परिषदचे चार नगरसेवक अपात्र
सत्ताधारी व विरोधी पक्षाचे प्रत्येकी दोन नगरसेवकांची पदे झाली रद्द
जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर यांचे आदेश पारित
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - चिमूर नगर परिषदची निर्मिती ३० मे २०१५ ला झाल्यावर पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते तेव्हा भाजपचे ६ व ४अपक्ष असे १७ सदस्य असलेल्या नगरपरिषदवर भाजपने सत्ता स्थापन केली पण अडिच वर्ष झाल्यानंतर नोंदणीकृत गट फुटला आणि कांग्रेसची सत्ता बसली दरम्यान चिमूर येथे २४/७ पाणी पुरवठा योजना व इतर विषयावर ठराव पारित करतांना नगर परिषद उपाध्यक्ष तुषार शिंदे,बांधकाम सभापती नितीन कटारे ,नगर सेविका जयश्री निवटे व नगर सेवक तुषार काळे हे सभेत तटस्थ होते त्यामुळे भाजपच्या गटनेत्या छाया कंचर्लावार यांनी व्हीप न पाळल्यामुळे या चार सदस्यांना अपात्र करणेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी चंद्रपूर येथे केस दाखल केली होती त्यावर अंतिम आदेश पारित होऊन दिनांक. ३ ऑगस्टला चार नगरसेवकांना अपात्र घोषित केले आहे . यात विद्यमान परिस्थितीत सत्ताधारी दोन व विरोधी दोन नगरसेवक आहे त्यामुळे सत्ताधारी अल्पमतात येण्याची चिन्हें आहे . या निर्णयामुळे कांग्रेस व भाजपात मोठी खळबळ माजली आहे .चिमूर नगर परिषद मध्ये पहिल्याच अडीच वर्षाच्या काळात भाजपची अपक्षणा घेऊन सत्ता स्थापण केली होती त्यात तत्कालीन नगराध्यक्ष शिल्पा राचलवार गटनेता छाया कनचलवार , नगरसेवक भारती गोडे, उषा हिवरकर ,हेमलता ननावरे ,नितीन कटारे हे भाजपचे नगरसेवक असून चार अपक्ष नगरसेवक त्यात सतीश जाधव, तुषार शिंदे ,जयश्री निवटे,तुषार काळे या अपक्ष नगरसेवकांनी गटबंधन करून सत्ता मिळविली होती तर कांग्रेसच्या विरोधी गटात नगरसेवक अब्दुल कदिर शेख, गोपाल झाडे ,अरुण दुधनकर, वर्षा बंडे ,कल्पना इंदूरकर
तर शिवसेनेच्या सीमा बुटके व उमेश हिंगे यांचे गटबंधन होते .असे दोन्हीं पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे नोंदणीकृत गट होते .
दरम्यानच्या काळात चिमूर नगर परिषद ला २४ तास पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली व इतर काही विषयावर एका सभेत ठराव घेत असताना भाजप गटातील नितीन कटारे ,तुषार शिंदे ,जयश्री निवटे,तुषार काळे हे(व्हीप) पक्ष आदेश झुगारून तटस्थ राहिले त्यामुळे ठराव पारित होऊ शकला नाही त्यामुळे तेव्हा तत्कालीन सत्ता पक्ष गटने पक्षदेश न पाडल्यामुळे गटनेत्या छाया कँचालवर यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हादण्डधिकारी चंद्रपूर यांचे कडे केस दाखल केली गेल्या दीड वर्षांपासून याप्रकरणी तारखा सुरू होत्या जिल्हाधिकारी यांनी ३ आगस्टला याप्रकरणी निकाल देत ४ नगर सेवकांना अपात्र घोषित केले असून त्यात विद्यमान उपाध्यक्ष तुषार शिंदे ,बांधकाम सभापती नितीन कटारे ,नगर सेविका जयश्री निवटे ,नगर सेवक तुषार काळे यांना अपात्र घोषित करून त्याचे पदे रद्द केली आहे.त्यामुळे सत्ताधारी व विरोधी दोन्ही गटाच्या प्रत्येकी दोन नगरसेवक अपात्र झाले असल्याने राजकिय खळबळ माजली असून सत्ताधारी गट अल्पमतात आले असल्याचे बोलले जात असून आता चिमूर नगर परिषद च्या राजकारणात काय घडामोडी घडडतात याकडे जनतेच्या नजरा लागल्या आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!