वंचित बहुजन आघाडीची सत्ता येणार - एड राजेंद्र महाडोळे
वंचित बहुजन आघाडीची सत्ता येणार
- एड राजेंद्र महाडोळे
चिमूर तालुका अध्यक्ष पदावर स्नेहदीप खोब्रागडे यांची निवड
जांबुळघाट येथे वंचित बहुजन आघाडीची सभा
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - दि. ०३/०८/२०१९ वंचित समाजातील बारा बलुतेदार समूहाची ताकत वाढत आहे, या समूहाचे नेतृत्व करणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे तळागाळातील जातीसमूहाला एकत्र करून महाराष्ट्राची सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न बघून आहेत, याकरिता आपल्या क्षेत्रातील माना, तेली, माली, ढिवर, धनगर, शिंपी, म्हाळी यांना एकत्र घेऊन संघटन बांधणी करायची आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दीड कोटी स्वयंसेवक आपल्या विरोधात रचनात्मकरित्या काम करीत आहेत ,त्याकरिता अपल्यालासुद्धा वेगवेगळ्या पातळीवर काम करावे लागेल, असे आवाहन एड राजेंद्र महाडोळे यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष एड राजेंद्र महाडोळे यांच्या प्रमूख उपस्तिथीत झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी, माजी राज्यमंत्री डॉ रामेशकुमार गजभे होते, यावेळी मंचावर अरविंद सांदेकर , राजेंद्र मेश्राम, नीलकंठ शेंडे, गजेंद्र चाचरकर, बळवंत ठवरे, एड नितीन रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.
या सभेत बहुजन वंचित आघाडीच्या चिमूर तालुका अध्यक्षपदी स्नेहदीप खोब्रागडे, महासचिव गजेंद्र चाचरकर, उपाध्यक्ष अरविंद चौधरी यांची निवड करण्यात आली.
या सभेचे संचालसन कुमारी मोनाली ठाकरे, प्रास्ताविक अरविंद सांदेकर , तर उस्थितांचे आभार मंगेश रणदिवे यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!