चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हे कायमची बंद करावी
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हे कायमची बंद करावी
पालकमंत्री जी जिल्ह्यातील महिला,युवकांना बरबाद करणारी दारूबंदी बंद करा हो आता...! सुनिता सिंग,भरती बोबडे
जिल्ह्यात दारूबंदी नंतर ३१ हजार गुन्हे, ३५ हजार आरोपी, १७९ कोटीची मालमत्ता जप्त
वरोरा - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : दिनांक .०३/०८/२०१९ दारू बंदी हा १ एप्रिल २०१५ चा तो दिवस व या नंतरही आज चंद्रपूर जिल्ह्यातील १४ तालुक्यात सर्वच ठिकाणी दारू सहज उपलब्ध होत आहे. यावर अंकुश लावण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कोणतेच प्रयत्न केलेले नाही. त्यांच्याच इशाऱ्यावर दारूबंदीनंतर ही दारू मोठ्या प्रमाणावर विकल्या जात आहे. दारू तस्करांचे हप्ते पालकमंत्री साहेबांना मिळत आहे म्हणून दारूबंदीचा पुनर्विचार करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करण्याची मागणी करून सुद्धा समीती गठीत केली नाही, असा सरळ सरळ आरोप त्यांनी लावला. जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर अवैध दारू विक्री करणाऱ्यावर माझ्या २५ हजार कार्यकर्त्यांची करडी नजर राहील, असे त्यावेळी अड.पारोमिता गोस्वामी म्हणाल्या होत्या.आता जिल्ह्यात दारूचा महापूर वाहत असताना त्या गप्प आहेत.त्यांचे २५ हजार कार्यकर्ते कुठे गेले? उलट भाजपशी संगनमत करून त्या सेट झाल्या असल्याचा आरोप ही यावेळी करण्यात आला.
जिल्ह्यात शासनाद्वारे १एप्रिल २०१४ ला दारूबंदी लागू केल्यानंतर त्याचे चांगले फलित पाहायला मिळेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. परंतु सस्पेशल खोटी ठरली असून दारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात चार वर्षात ३१ मार्च २०१९ पर्यंत ३१७३२ गुन्हामध्ये ३५७०८ आरोपी पकडले गेले असून त्यांच्याकडून १७८.८० कोटी रुपयांची मालमत्ता शासनांनी जप्त केली आहे. जिल्ह्यात दारूबंदीनंतर घडलेल्या आर्थिक परिणामाची समीक्षा करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी म्हणून महिला संघटनेमार्फत शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री यांना वारंवार भेट घेवून रीतसर कळविण्यात आले.परंतु त्याची दखल न घेतल्यामुळे आगामी १० - १२ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सर्व समान महिला बहुउद्देशीय संस्था व अन्याय भ्रष्टाचार निवारण समितिच्या अध्यक्षा अनुक्रमे सुनिता सिंग व भारती बोबडे यांनी वरोरा येथेआयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिला.
जिल्ह्यातील लोकांना शासन भ्रमित करत आहे. जिल्ह्यात बनावट दारूचा महापूर सुरू आहे. झटपट पैसे मिळण्याच्या नादात जिल्ह्यातील लहान मुले - मुली या धंद्यात सहभागी झाले असून अनेक शाळा मधील मुलानं मध्ये अमली पदार्थाचे सेवन करण्याचे प्रमाण सुद्धा वाढीस लागले आहे. नशेसाठी मोठ्या व्यक्तीसह लहान शाळकरी मुले बोनी फिक्स, हारपील , मार्कर पेन, नेल पॉलिश, गांजा ,अफीम च्या पलीकडे गेले आहे. दारू बंदी मुळे जिल्ह्यातील करोडो रुपयांचा महसूल बुडालेला आहे. पकडलेल्या दारू मधील केवळ लहान बॉटलच नष्ट केल्या जात आहे. ब्रँडेड दारूच्या बोटला परस्पर विकल्या जात आहे. दारू विकण्या मध्ये पोलिसांचा सुद्धा सहभाग आहे असा खळबळजनक आरोप समितीच्या महिला पदाधिकऱ्यांनी लावला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दारूबंदी करून जिल्ह्यातील वातावरण दूषित केले आहे .त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील महिलांनी, दारुविरोधी मतदारांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या खासदाराची विकेट पाडली. यापासून धडा घेवून दारूबंदी हटाव मोहीम वर अपेक्षित निर्णय न घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपाच्या ६ ही आमदाराच्या विकेट येथील जागरूक महिला, नागरिक निश्चित पाडतील, असा गर्भित इशारा ही त्यांनी यावेळी दिला. संपूर्ण भारतात स्वच्छता अभियान सुरू असताना चंद्रपूर मध्ये दारूबंदीच्या नावावर अस्वच्छता घाण पसरवण्याचे काम येथील पालकमंत्री करित आहे. दारूबंदीमुळे दारूविक्री साठी होणाऱ्या आपसी झगड्यात अनेक ठिकाणी हल्ले होऊन यात जीवित हानी सुद्धा झाली आहे. तसेच वैध ठिकाणी दारुपिण्यास जाणारे लोक अपघातात मरत आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे.मूले -मुली वाममार्गाला लागत आहे. या सर्व घटनेसाठी पालकमंत्री खुद्द जबाबदार असल्याचे मत त्यांनी मांडले. दारूबंदीच्या विरोधात बोलताना दारू तस्करांकडून धमक्या मिळत असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील शासनाने केलेली दारूबंदी फक्त कागदा पुरती मर्यादित असून जिल्ह्यातील मोठ्या दारू तस्करांना पकडण्यात पोलिसांना अजून पर्यंत पाहिजे तसे यश संपादन करता आले नाही. उलट दारूबंदी मुळे कुटुंबामध्ये क्लेष वाढत असून अनेक परिवारातील होतकरु मुले नाहक बळी पडत आहेत. दारूबंदी हटवण्यासाठी आमच्याकडे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीचे ,बचत गटाच्या पतसंस्थेचे ठराव आहेत. जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर त्याचा खरोखर परिणाम झाला काय याची समीक्षा होणे गरजेचे आहे . दारूबंदी मुळे येथील पोलिस पदाधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगभले झाले आहे. या सर्वांवर आयकर चौकशी लावल्यास दारूबंदीचे गभाड उजेडात येण्यास वेळ लागणार नाही. शासनाने अतिउत्साहात घेतलेल्या दारूबंदीचा निर्णय फोल ठरलेला आहे असे तत्व सर्वत्र दिसून येत आहे .याबाबत राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल जिल्ह्याचे पालकमंत्री आदींना निवेदन देऊन सुद्धा याकडे सरासर दुर्लक्ष करण्यात येत आहे मागील २ वर्षांपासून संगठन याबाबत लढा देत आहे. दारूबंदी करून रोजगारही राहणाऱ्या पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार त्या बेरोजगार युवकांसाठी रोजगाराची कुठलीही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही त्यामुळे अनेक होतकरू युवक दारू विक्रीच्या व्यवसायात लागून अपराधी बनताहेत. याला संपूर्णपणे पालकमंत्री जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी पत्रपरिषदेत लावला. राज्यातील मोजके जिल्ह्यावर दारूबंदी न लादता ती संपूर्ण राज्यावर लादावी. अन्यथा जिल्ह्यातील दारूबंदी तात्काळ उठवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेमध्ये सुनिता सिंग, भारती बोबडे, दुर्गा भगत, पुष्पा डे ,माला दास, सरस्वती ठाकूर, अर्चना शील, मीरा वेलके व सष्टी राय प्रामुख्याने उपस्थित होत्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!