रस्त्याची दयनीय अवस्था; प्रशासनाने लक्ष देन्याची नागरिकांची मागणी.
सुभाष नगरातील रस्त्याची दयनीय अवस्था.
नगर परिषदेने दखल घेण्याची नागरिकांची मागणी.
मुल( प्रकाश चलाख)
मुल येथील प्र. क्र. 4 सुभाष नगर वार्ड नंबर 8 येथील रस्त्याची दयनिय अवस्था झाली असून पावसाळ्यात नागरिकांना रस्त्यावरून जाणे-येणे करणे कठीण झाले आहे संबंधित प्रकाराबाबत नगरपरिषद तसेच लोकप्रतिनिधी यांनी संबंधित कामाकडे लक्ष द्यावे अशी मागणी वार्ड नंबर 8 सुभाष नगर मुल येथील नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मुल येतील प्रभाग क्रमांक चार सुभाष नगर वार्ड नंबर 8 येथे नागरिकांचे पंधरा वर्षांपासून वास्तव्य आहे. हा परिसर मुख्य मार्गावरील एचडीएफसी बँकेच्या मागील परिसर असून या वॉर्डात जाण्या-येण्यासाठी आम रस्ता असून सदर रस्त्यावर सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले आहे .नागरिकांना सदर रस्त्यावरून पायदळ जाणे सुद्धा कठीण झालेले आहे. रस्त्याच्या मागणीबाबत प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांनी मुल प्रशासन यांना अनेक निवेदने दिलेली आहेत. परंतु कुणीही गांभीर्याने घेतलेले नाही.
सदर प्रभागात रस्त्यासोबत इतर समस्याही आ वासून उभे असून अनेक संकटांना सामना करून येथील नागरिक जीवन जगत आहेत. या प्रभागात दिवे नाही. पथदिवे लावण्यासाठी वीज वितरण कंपनीने दोन महिन्यापूर्वी खांब उभे केले आहे परंतु त्या खांबावर अजूनही तार जोडलेली नाहीत. त्यामुळे या परिसरात अंधाराचे साम्राज्य आहे.
मुल शहर हे सुंदर शहर म्हणून नावारूपास येत असताना येथील जनता मात्र अनेक मूलभूत सोयींपासून वंचित असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी समस्यांचा निपटारा त्वरित करावा. अशी सुभाष नगरातील रामू शेंडे, किशोर आयलवार, बंडू शेंडे ,तिमांडे, निर्मल वार, अलीम शेख व सुभाष नगर वार्ड नंबर आठ येथील सर्व जनतेची मागणी आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!