व्यथा अपंग गुरुदासची
व्यथा अपंग गुरुदासची,
जीवन जगण्यासाठी कुटुंबाला करावी लागते कसरत.
नेरी/चिमूर : शुभम बारसागडे
चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी गोंदेडा येथील अपंग युवक गुरुदास सुरेश बावने याचे जीवन जगन्यासाठी व पोठाची खळगी भरण्यासाठी परिवाराला कसरत करावी लागत असून गुरुदासच्या अपंगत्वमुळे या कुटुबावर उपासमारी ची पाळी आली आहे.
गोंदेडा येथील गुरुदास बावने यांच्या परिवारात आई वडील व गुरुदास असे तीन लोक असून गुरुदास हा जन्माला आला तेव्हा ह्याला कुठलेही अपंगत्व नव्हते. गुरुदासला लहानपनापासुन भजन आणि कीर्तनचा खुप छंद होता. गावातील शाळेत चांगल्या प्रकारे तो शिक्षण घेत होता. तिसऱ्या वर्गात असताना खेळताना घसरून पडल्यामुळे त्याच्या जीवनाला वेगळी कलाटनी लागली आणि संपूर्ण आयुष्यभर त्याच्या वाट्याला खाट नशिबात आली. आता या खाटेवरच तो आपले संपूर्ण विश्व पाहत असून, त्याला भयंकर असे अपंगत्व आले आहे. संपूर्ण शरीर स्थूल पडले. ना चालता येत ना उठून बसता येत. हाता पायांची हालचाल सुद्धा करता येत नाही. निव्वळ खाटेवर झोपून राहण्यापलीकडे दुसरं काही करण्यासाठी गुरुदास कडे पर्याय उरलेला नाही. जेवन सुद्धा त्याला चारूंन द्यावे लागते. इतर क्रिया करण्यासाठी त्याला उचलून न्यावे लागतें. एवढी मोठी व्यथा त्याच्या नशिबात आली आहे.
गुरुदासची देखभाल करण्यासाठी घरातील एका व्यक्तीला सतत घरी राहावे लागतें. घरची परिस्थिति अठरा विश्व दारिद्र त्याचे वडील अल्प भूधारक व आई गृहिणी आहे. या अपंगत्व मुळे परिवाराला जीवन जगन्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
गुरुदास अपंगत्व जळले तेव्हा त्याला नागपुर, चंद्रपुर, वर्धा येथील मोठमोठ्या हॉस्पिटल ला उपचारासाठी नेले. मात्र कुठेच फायदा झाला नाही. आर्थिक स्थिति मुळे त्याचेवर ही पाळी आली आहे. त्याच्या अपंगत्वाला मदतीसाठी पं.स.,जी.प., ग्रा.पं यांना अर्ज केले परंतु कुठलाही लाभ मिळला नाही. समाजकल्याण योजनेतून अपंगत्व साठी महिन्याकाठी 600 रुपये मिळतात आणि ती रक्कम उचलण्यासाठी त्याला उचलून नेरी येथील बँकेत न्यावे लागते. त्याची देखभाल करण्यासाठी आई किव्हा वडील यांनपैकी एकाला घरीच पडून राहवे लागते. त्यामुळे एकट्याच व्यक्तीला मोल मजुरी करून संपूर्ण कुटुब पोसावे लागत आहे. त्यातच कधी मजूरी मिळते तर कधी नाही. तरीही कसे बसे करून जीवन जगावे लागत असून, पोटाची खळगी भरण्यासाठी हे कुटूंब मोठी कसरत करीत आहे. अश्या परिस्तिततही गुरुदास ने आठवी पर्यंत चे शिक्षण घरुनच घेतले. आता खाटेवर पड़ूंन जीवन जगन्यापलीकडे त्याच्या कड़े पर्याय उरला नाही. त्याच्याकडे बघून आई वडील जीवन जगत आहेत. त्यांना कुणाचाही आधार नाही. तेव्हा या गुरुदासच्या अपंगत्वला आणि पोटाची खळगी भरण्यासाठी शासनाने मदत करावी असे त्याच्या आई वडिलांनी प्रतिनिधिशी बोलताना सांगितले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!