मासळ – पळसगाव रस्त्याला आले नदिचे स्वरूप
मासळ – पळसगाव रस्त्याला आले नदिचे स्वरूप
संबंधित विभागाचे दुर्लक्ष हे वाहन धारकात व विद्यार्थीन मध्ये तिव्र रोष
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - दि.०३/०८/२०१९ चिमूर तालुक्यातील मासळ – पळसगाव रस्तावर वरील गावालगत असलेल्या (डोडा) यापुलाला वरील गेल्या काही दिवसापासून नदीचे स्वरूप आले कि काय,? सदर रोडने चिमूर शिंदेवाही येथे शिक्षणासाठी येथील किती तरी विद्यार्थी येतात रोज शिक्षणा करिता परिसरातील मुले नागरिक शासकीय कामा करिता जात असतात पळसगाव या मार्गाची गेल्या अनेक दिवसांपासून बिकट अवस्था झाली असून, या मार्गावर मोठया प्रमाणात पुलावरती खडयाचे साम्राज्य निर्माण झाले असून सदरील मार्ग हा लवकरात लवकर दुरूस्त करण्याची मागणी परिसरातील वाहनधारकासह ग्रामस्थांतून होत आहे.सदर पुलाची उंची कमी असल्यामुळे व पुलावारती १० फुट पाणी असल्यामुळे सदर रोड पूर्णता बंद झाला असून जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांना अक्की रात्र शिक्षकांना शाळेत काढावी लागली आहे चिमूर तालुक्यातील पळसगाव या रस्त्याची पार दुरवस्था झाली असल्याने या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी नागरिकां मधून जोर धरत आहे. या मार्गावर नवीन पुलावरती जागोजागी खड्डे पडून त्यामधून वाहने चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ तथा वाहनधारकांकडून होत आहे. सध्या पावसाळा सुरू असून या मार्गावर असणारया खडयामध्ये पाणी भरत असते. यामुळे त्या खड्यांची खोली लक्षात न येता वाहनधारक आपले वाहन सावरत नेत असताना जर खडयात गेले तर पडल्या शिवाय राहत नाहीत यामुळे या मार्गावर जिवीत हानी होइल याची शाश्र्वती देता येत नाही. या कारणामुळे या पुलाची व मार्गाची लवकरात लवकर दुरूस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!