उमा नदी परिसरातील अतिक्रमण काढण्याची मागणी
उमा नदी परिसरातील अतिक्रमण
काढण्याची मागणी
सामाजिक फाऊंडेशन अध्यक्ष प्रदीप बंडे
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - चिमूर नगर परिषद हद्दीत येत असलेल्या उमा नदी च्या परिसरात शेकडो नागरिकांनी अतिक्रमण केले असून अतिक्रमण जागा ही पूरग्रस्त असल्याने काही तथाकथित नगरसेवक भोगवटा कर लावण्याची मागणी करीत असून ती मागणी अयोग्य असून अतिक्रमण हटविण्याची मागणी माजी ग्राम पंचायत सदस्य तथा सामाजिक फाउंडेशन अध्यक्ष प्रदीप बंडे यांनी केली आहे
चिमूर च्या उमा नदी च्या प्रभाग 11 मधील पूर ग्रस्त जागेवर शेकडो नागरिकांनी अतिक्रमण करून वास्तव्य करू लागले असून परंतु तो परिसर पूरग्रस्त आहे नुकताच अति पावसामुळे पूर आला त्यात आर्थिक नुकसान झाले तेव्हा याची काळजी कोणी घेतली नाही परंतु काही संधिसाधू नगरसेवक भोगवटा कर लावण्याची भाषा करू लागले असून ते हास्यास्पद आहे 12 वर्षा पूर्वी ग्राम पंचायत च्या काळात तत्कालीन सदस्य असताना सुद्धा भोगवटा कर लावण्याचा विरोध करून लावू दिला नाही आणि तसा अहवाल जिल्हाधिकारी यांना कळविला तेव्हा जिल्हाधिकारी यांनी उमा नदी परिसर पूरग्रस्त क्षेत्र घोषित केले परंतु विधमान नगरसेवक भोगवटा कर लावण्यासाठी आंदोलन केले असले तरी ते चुकीचे आहे
मासळ रस्त्याकडील व पेठमोहला परिसरात अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केले असून वास्तव्यास राहू लागले असून पुरा मुळे जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण राहील असा प्रश्न निर्माण झाला असून नगर परिषद ने उमा नदी च्या परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मागणी माजी ग्राम पंचायत सदस्य तथा सामाजिक फाउंडेशन अध्यक्ष प्रदीप बंडे यांनी केली असून अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!