लक्षवेधी अांदोलनाने वेधले लक्ष

लक्षवेधी अांदोलनाने वेधले लक्ष 
महात्मा गांधी पुतळ्याच्या  सौंदर्यीकरणासाठी  लक्षवेधी  अांदोलन


मूल  (अमित राऊत)
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला  येथिल राष्ट्रपिता  महात्मा गांधीजींच्या पुतळ्याच्या  सौंदर्यीकरणासाठी पुतळ्याजवळ  बुधवारी लक्षवेधी  अांदोलन करण्यात  अाले  . या अांदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता गौरव शामकूले यांनी केले . 
        मूल शहराचा विकास झपाट्याने होत असताना मूल येथिल मध्यवर्ती ठिकानातील गांधी चौकातील राष्टूपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत अाहे . 
           पुतळ्याच्या खाली सभोवताल पावसाचे पाणी नेहमी साचलेले असते .फळांचे दुकान ,   घाणीचे साम्राज्य, तूटलेले साइडचे रेलींग, बाजुलाच  लावलेली कचरा पेटी, बॅनर  हे सर्व दृश्य स्मार्ट सिटी साठी ग्रहण ठरीत अाहेत  स्वातंत्र्यपूर्व काळात  राष्ट्रपिता  महात्मा गांधीजींचा   मूल मध्ये दोनदा पदस्पर्श लाभलेला अाहे . मूल मार्गे सावलीला त्यांचा मुक्काम होता . या काळात त्यांनी सत्य, अहिंसा व स्वच्छतेचा प्रत्यक्ष कृतीतून  संदेश दिला होता .  
       दौ-याची अाठवण म्हणून येथे महात्माजींचा संगमवरी पुतळा उभारण्यात अाला  . परंतु पुतळ्याच्या सभोवताल बाधा निर्माण करणा-या गोष्टी निर्माण होत अाहेत . त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात अधिक भर पडावी , दोन अाक्टोबरच्या अाधी     गांधी चौकाचे , पुतळ्याचे सौंदर्यीकरणं करावे  ,पुतळ्याच्या अोठ्याची उंची वाढविण्यात यावी अादी मागण्या गौरव  शामकूले यांच्या तर्फे यावेळी करण्यात अाल्या . लक्षवेधी अांदोलनाने नागरिक अाणि प्रशासनाचे  लक्ष वेधून घेतले .त्यानंतर नगर परिषदचे मुख्याधिकारी सरनाईक यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना गौरव शामकुळे, या प्रशांत गट्टूवार, सुजित खोब्रागडे, कुमार दुधे यांनीही समर्थन देत उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!