मूल येथे कुणबी महिला महासंघाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

मूल येथे कुणबी महिला महासंघाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार


मूल (अमित राऊत)
मूल शहरातील कुणबी समाज
महिला महासंघाचे वतीने समाजातील गुणवंतांचा
सत्कार तालुका क्रीडा संकुल मूल येथे पार पडला. या कार्यक्रमात नगराध्यक्षा रत्नमाला भोयर ह्या उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या.
गुणवंतांचा सत्कार केल्याने गुणवंतांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांना प्रेरणा मिळते, समाजातील मुले शिकावी व मोठ्या प्रमाणात
अधिकारी व्हावीत, यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले पाहिजेत असे मत आपल्या वक्तव्यात स्पष्ट
केले. 
     मुलांनी आपल्या आवडीनुसार करीअर करावे त्यासाठी आवडीचे क्षेत्र निवडावे असे मत सुनील शेरकी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
महिला महासंघाचे वतीने समाजातील गुणवंत
विद्यार्थी  तसेच  पत्रकार अमित राऊत , नाट्य कलावंत सुनील कुकुडकार याचाही याप्रसंगी
सत्कार करण्यात आला. यावेळी सुनील शेरकी गजानन नागापूरे ,प्रभाकर भोयर ,विद्या बोबाटे,रुमदेव गोहणे गणेश मांडवकर ,राजेश्वर राजुरकर , मारोती शेरकी ,सुधाकर चरडुके आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन संजिवनी वाघरे तर प्रास्ताविक सुधा चरडुके व आभार साधना सातपुते यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कल्पना नरुला,शशीकला मांडवकर ,किरण चौधरी ,सविता
झाडे ,उषा गोहणे, वर्षा तिवाडे, पपिता झरकर, अर्चना चावरे, सुलोचना तांगडे यांनी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!