सामाजिक युवा ब्रिगेड संघठना व् नवरगाव पोलिस चौकितील कर्मचारी यांनी मिळून नैनपुर च्या जंगलातील मोह भटिचा एकूण एक लाख आठ हजाराचा मुदेमाल पकडला

सामाजिक युवा ब्रिगेड संघठना व् नवरगाव पोलिस चौकितील कर्मचारी यांनी मिळून नैनपुर च्या जंगलातील मोह भटिचा एकूण एक लाख आठ हजाराचा मुदेमाल पकडला


नवरगाव (अमोल निनावे)                                  आज झेंडा वंदन व् रक्षाबंधंनाचा कार्यक्रम पोलिस चौकी नवरगाव इथे झाल्यानंतर काही लोकांच्या गुप्त माहिती नुशार पोलिस चौकीचे पूर्ण नविन टीम आणि सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे प्रमुख व् सदश्य मिळून नवरगावच्या एकदम हाकेच्या अंतरावर असलेल्या नैनपुर गावाला तपासणी केली अस्ता जंगला लगत असलेल्या ठिकाणी मोह भटी सुरु असलेली आढ़ळ ली त्यात एकूण 10 प्लास्टिकच्या  क्यानमधे प्रत्येकी 20 लीटर प्रमाणे 200 लीटर हातभटी मोह दारू प्रति लीटर 200रु प्रमाणे 40,000रु चा माल तसेच 13 नग प्लास्टिक ड्राम मधे अन्दाजे प्रत्येकी 50 किलो मोह सडवा असा एकूण 650 किलो मोह सडवा .100रु प्रति किलो प्रमाणे एकूण 65 हजार रु व् इतर दारू काढण्यासाठी लागणारे साहित्य 3000 रु अशा प्रकारे एकूण 1 लाख 8 हजार चा माल जप्त करण्यात नवरगाव पोलिस चौकितील नविन कर्मचारी टीम ला यश आले आहे.आरोपी नैनपुर  येथील 23 वर्षीय प्रशिक् चोखोबा खोब्रागड़े असून तो आता पोलिसानाच्या कबज्यात आहे.या कारवाई साठी प्रामुख्याने पोहवा विनोद बावणे ब,न,1188,पोहवा वसंता नागरिकर 929,नापोशी विजय वाकडे 1116,पोशी मंगेश श्रीरामे तसेच सामाजिक युवा ब्रिगेड संघठन प्रमुख श्री अमोल सेवादास निनावे ,अशोक निमगळे  व् प्रणय गायकवाड़ हे होते.समोरिल तपास नवरगाव पोलिस चौकितील टीम करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!