मूल शहरातील स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधन उत्साहात साजरा

मूल शहरातील स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधन उत्साहात साजरा
रक्षाबंधंणात आलेली ओवाळणी  पुरग्रस्थाना पाठविणार.


 मूल (अमित राऊत)
     आज स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशात साजरा होत असतानाच मूल शहरात सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात विध्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे श्रीसाई मित्र परिवार तर्फे चॉकलेट, बिस्कीट वाटण्यात आले. 


      विशेष म्हणजे स्वातंत्र्यदिनी रक्षाबंधनाचा पवित्र सन एकत्र  आल्यामुळे दोन्ही सन मुल शहरात  साजरा करण्यात आला. मूल नगर परिषद, बाजार चौक तसेच प्रशासकीय भवनात झेंडा फडकविन्यात आला.  प्रशासकीय भवनात उपविभागीय  अधिकारी महादेव  खेडकर यांच्या हस्ते झेंडा फडकविन्यात आला. झेंडा वंदन झाल्यानंतर मूल नगरपरिषदेच्या नगरअध्यक्षा रत्नमाला भोयर यांच्या पुढाकारातून रक्षाबंधनाचा कार्यक्रम पुरग्रस्थाठी मदत म्हणून  साजरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा रत्नमाला  भोयर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, नगर परिषदेच्या  सर्व नगरसेविका यांनी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर , उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश तायवाडे,  तहसीलदार डी.जी. जाधव, नगर परिषदेचे  मुख्याधीकारी विजय सरनाईक तथा कर्मचारी,  संवर्ग विकास  अधिकारी पंचायत समिती, पोलीस स्टेशन चे ठाणेदार मुरलीधर कासार व पोलीस कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधन हा पवित्र सन साजरा केला. रक्षाबंधनात आलेल्या ओवाळणीतुन जमा झालेला पैसा पूरग्रस्त भागात पाठविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा रत्नमाला  भोयर यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!