महाजनादेश म्हणजे विकास !

महाजनादेश म्हणजे विकास !

सुधीर भाऊंचे हात पुनश्च बळकट करा.

         देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री( म.रा.)

 मुल (प्रकाश चलाख ) 

 महाजनादेश म्हणजे "विकास". विकासाची गंगा आपल्या तालुक्यात पुन्हा रुजवायची असेल तर महाजना देशाच्या माध्यमातून सुधीर भाऊ यांचे हात  पुन्हा बळकट करा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत केले.

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तीर्थक्षेत्र असलेल्या गुरुकुंज मोझरी येथून 1 ऑगस्टला सुरू झालेल्या महाजनादेश यात्रा आज मुलमध्ये आली .या यात्रेच्या निमित्ताने प्रचंड जनसमुदायाला संबोधित करीत असताना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित जनतेला संबोधित केले.

  जनादेश यात्रा कर्मवीर महाविद्यालय मुलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आली होती. या जनादेश यात्रेनिमित्त प्रचंड  जनसमुदायाला मार्गदर्शन  करीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेसमोर आपला पाच वर्षाचा  लेखा- जोगा वाचला. विकासाच्या बाबतीत अनेक विकासात्मक कामे आपल्या सरकारने केली असून शिक्षण, आरोग्य, बांधकाम ,कृषी   या विभागात अनेक योजनांच्या माध्यमातून आपण निधी कमी पडू दिला नाही. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याने राज्याची तिजोरी मजबूत असून  विकास प योगी कामे मार्गी लावण्याचे काम आपल्या सरकारने केले आहे.

 जिल्ह्यातील आपल्या तालुक्याच्या विकासाकडे पाहिले असता मागास तालुका म्हणून गणल्या गेलेल्या व काँग्रेसच्या राजवटीत विकासापासून कोसो दूर असलेल्या या तालुक्याला नवसंजीवनी मिळवून देण्याचे काम सुधीर भाऊंनी केले आहे. शासनाने  निधीच्या माध्यमातून विकासासाठी भरपूर सहकार्य केले आहे .त्यामुळे महाजना देशाच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत आपला आशीर्वाद मागण्यासाठी व गरिबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या व माझ्या कर्मभूमीत आलो आहे. याचा मला अधिकाधिक आनंद  आहे असे  भावोद्गा गार राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले .

 गेल्या पाच वर्षाचा हिसाब देताना सांगितले की गेल्या पंधरा वर्षात काँग्रेसच्या काळामध्ये जी कामे झाली नाही ती कामे आम्ही विकास केंद्र म्हणून मार्गी लावून  पूर्ण केलेली आहे  .

 महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी राबविलेली कर्ज माफी योजना शेतकऱ्यांच्या हिताची आहे. शेतकऱ्यांचे सन्मानाची आहे .जोपर्यंत तळागाळातील शेतकऱ्याला याचा फायदा होणार नाही तोपर्यंत ही योजना चालू राहील असा पुनरुच्चार कर्जमाफी बद्दल देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 "मुल तालुका हा सिंचन क्षमतेत मागे होता. काँग्रेसच्या राजवटीत एकही मोठे प्रकल्प वा मोठे काम सिंचनाचा बाबतीत झाले नाही. मूल तालुक्यातील  चिचाला व लगतच्या सहा गावांतील सिंचनाचा प्रश्न काँग्रेसच्या राजवटीपासून प्रलंबित होता . या विभागातील शेती संपूर्णता निसर्गाच्या भरवशावर असल्यामुळे  येथील शेतकऱ्यांनी हा प्रश्न सुधीर भाऊंकडे मांडला. त्यांनी जनतेच्या हिताकडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावला. 23 कोटी 47 लक्ष 54 हजार रुपयाची ही योजना येत्या काही वर्षात पूर्णत्वास येईल. सहा गावांतील तीन हजार एकर जमीन या सुविधेमुळे ओलिताखाली येणार आहे. दोन हजार शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार असून या परिसरातील शेती ही सुफलाम सुजलाम  बनणार आहे."


  देशात, राज्यात काँग्रेस बाद झाली असून  काँग्रेसला कुठलाही विषय नसून  जनतेला मूर्ख बनविण्याचे काम काँग्रेस करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

 या सभेला सुधीर भाऊ मुनगंटीवार, देवराव भोंगळे ,जिल्हा परिषद अध्यक्ष राम लखिया ,संध्या गुरनुले आदींनी मार्गदर्शन केले. 

 महाजन आदेश यात्रेला मूल, सावली, पोंभुरणा, बल्लारपूर येथील जनता प्रचंड संख्येने उपस्थित होती.

  महाजन आदेश यात्रेच्या निमित्ताने मंचावर देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार ,राधाकृष्ण विखे पाटील देवराव भोंगळे, जिल्हा परिषद अध्यक्ष हरिष शर्मा, भाजपा जिल्हाध्यक्ष संघटक राम लखिया ,जिल्हा परिषद सदस्य संध्या गुरनुले , प्राध्यापिका रत्नमला भोयार, नगराध्यक्ष मुल पूजा डोहने, सभापती मुल प्रभाकर भोयर ,भाजपा शहराध्यक्ष चंद्रकांत आष्टणकर, नगरसेवक प्रशांत समर्थ आदी उपस्थित होते.




   

                             

                   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!