मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत निदर्शने करण्याच्या प्रयत्नात असलेले कार्यकर्ते स्थानबद्ध
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत निदर्शने करण्याच्या प्रयत्नात असलेले कार्यकर्ते स्थानबद्ध
वरोरा - प्रतिनिधी (आलेख रट्टे)
वरोरा :- शेतकरी शेतमजूर कामगार प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारां.न.खोटे आश्वासन देऊन त्यांच्यावर चे फसवेगिरी करणाऱ्या भाजप सरकार विरोधात ५ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातून वरोरा येथे आंबेडकर चोक मदे होती मुख्यमंत्री यांच्या वाहनाला थांबून काळे झेंडे दाखवून त्यांचे निशेद करण्याकरिता स्टेट बँक समोर काँग्रेस.कामगार संघटना जिल्हाध्यक्ष छोटू भाई शेख यांच्या कार्यालयात तयारी सुरू असताना पोलीस विभागाला त्याची माहिती मिळाली असताना तेथून पोलिस विभागाचे अधिकारी येऊन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले त्यात काँग्रेस कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष छोटू भाई काँग्रेस जिल्हा महासचिव डॉ.हेमंत खपणे नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल झोटिंग काँग्रेस तालुका अध्यक्ष साहेबराव ठाकरे युवा काँग्रेस विधानसभा क्षेत्र माजी अध्यक्ष आसिफ भाई रजा. डॉक्टर नीकोरे सचिन मेश्राम. युवा नेतां राजीक शेख,मारूख शेख,व इतर सुद्धा पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते सत्तेवर येण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे आश्वासन असे होते की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट हमीभाव शेतकऱ्याला मिळेल, कृषी पंपाला २४ तास विद्युत देण्यात येणार, दोन .कोटी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देऊ, पेट्रोल , डिझेल , ग्यास , चे दर कमी करण्यात येईल, एससी एसटी ओबीसी अल्पसंख्याक कॅटेगिरी येथील नागरिक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना तयार करणे व इतर अनेक सामान्य नागरिक शेतकऱ्यांना फायदा मिळवण्याकरिता योजना तयार करण्यात येईल असे व शेतकऱ्यांचे पूर्णता कर्जमाफी करू असेसुद्धा अनेक खोटे आश्वासन या आदी शासनाने देऊन आता आणखी निवडणूक जवड आल्यास खोटा वाजागाजा करण्याकरिता हे यात्रा काढलेली आहे आणि याचा विरोध करण्याकरिता काँग्रेस पक्षाकडून छोटूभाई याच्या कार्यलयात काळे झेंडे घेऊन निषेध करण्याची तयारी करत असताना पोलीस प्रशासनाने प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांना वरोरा पोलीस ठाण्यात नेवून अटक करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!