शासनाने २०० युनिट पर्यत ची वीज माफ करण्याची मागणी - काँग्रेस चे पप्पू शेख
शासनाने २०० युनिट पर्यत ची वीज माफ करण्याची मागणी
काँग्रेस चे पप्पू शेख
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - महाराष्ट्र राज्यात वीज ग्राहकांना वाढत्या वीज बिला ला सामोरे जाऊन आर्थिक भुर्दंड सोसावे लागत असल्याने घरगुती २०० युनिट पर्यत ची वीज माफ करण्याची मागणी कांग्रेस मिडिया प्रमुख पप्पू शेख यांनी केली आहे .
राज्यातील वीज ग्राहकांना त्यांच्या वीज बिलात इंधन कर मीटर आकार ,स्थिर आकार आदी आकार वाढवून वारेमाप वीज बिल येत असल्याने वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावे लागत आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतपिक उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच शेत पीक व्यतिरिक्त भाजी पाला उत्पन्न होऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी सरसकट वीज माफ करावी दिल्ली सरकारच्या धर्ती वर राज्यातील शासनाने २०० युनिट पर्यत ची वीज बिल माफ करण्याची मागणी कांग्रेस मिडिया प्रमुख पप्पू शेख यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!