उसेगांव येथील सार्वजनीक शौचालय तीन दिवसाच्या सततधार पावसामुळे पडले
उसेगांव येथील सार्वजनीक शौचालय तीन दिवसाच्या सततधार पावसामुळे पडले
पळसगांव - प्रतीनीधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - चिमुर तालुक्यातील नेरी जवळील उसेगांव येथील नेरी रोडवरील सार्वजनीक शौचालय येत असलेल्या सततधार पावसामुळे २९ जुलैच्या मध्यरात्री कोसळले.
तीन दीवसापासुन येत असलेल्या सततधार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे .तर एकीकडे जनजीवन पुर्णपणे वीष्कळीत झालेला आहे . नदी , नाले , बोड्या तुडुंब भरल्या आहेत .उमा नदी ओवरप्लो झालेली आहे . काही वर्षापुर्वी सुध्दा अशाच प्रकारे उसेगांव येथील सार्वजनीक शौचालय कोसळले होते . तशाच प्रकारे २९ जुलैच्या मध्यरात्री नेरी रोडवरील सार्वजनीक शौचालय कोसळले आहे . या शौचालयाचे काम नीष्क्रुष्ट दर्जाचे झाले तर नसावे ? असा प्रश्न उसेगांव वासीयांना पडला आहे . नागरीकांना ऐनवेळेवर सार्वजनीक शौचालय कोसळल्याने शौचास जाण्याची मुसीबत ओढवली आहे .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!