शिक्षकी पेशेला काळीमा फासणारा बापाने स्वतःच्या मुलीवर केले अत्याचार
शिक्षकी पेशेला काळीमा फासणारा बापाने स्वतःच्या मुलीवर केले अत्याचार
नागभिड (प्रतिनिधी) :
पेशाने शिक्षक असलेल्या व भाजपाचे माजी जि.प. सदस्य राहिलेल्या एक नराधम बापाने स्वतःच्या दोन मुलीवर सतत लैंगिक अत्याचार करीत असल्याची तक्रार नागभिड पोलिस ठाण्यात दाखल झाली. तक्रारीवरून नागभिड पोलिसांना गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.
पेशाने शिक्षक असलेला भाजपाचा माजी जि. प. सदस्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा नवरगाव येथील खासगी विद्यालयात शि्क्षक आहे. आरोपीस एक 17 व दुसरी 14 वर्ष वयाच्या दोन मुली आहेत. आरोपी गेल्या पाच-सहा वर्षापासून स्वतःच्या दोन्ही मुलीसोबत बळजबरीने अत्याचार करीत आला.

या मुलीची आई आजारी राहत असल्यामुळे व वाच्यता केल्यास घरात भांडणे होतील, या भीतीने हा अत्याचार त्या दोन्ही मुली मुकाटपणे सहन करीत होत्या. दोन दिवसापूर्वी त्यांने मोठ्या मुलीशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पण तिने तब्येतीचा बहाणा करून नकार दिला. व ती दवाखान्यात जातो असे सांगून ब्रम्हपुरी येथे मामांकडे गेली आणि सर्व हकीकत मामास सांगितली. मामाने मुलीच्या आईस याबाबत माहिती देऊन नागभिड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून आरोपीस अटक केली आहे.
पुढील तपास नागभिड पोलिस करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!