हिरकणी नवउदयोजक महाराष्ट्राची व महिला किसान सशक्तीकरण परियोजना


हिरकणी नवउदयोजक महाराष्ट्राची व महिला किसान सशक्तीकरण परियोजना

मुल (प्रकाश चलाख)

          महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मुल दवारे हिरकणी नवउदयोजक महाराष्ट्राची व महिला किसान सशक्तीकरण परियोजना विषयावर पंचायत समिती मुल येथिल सभागृहात एकदिवसिय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवर्ग विकास अधिकारी कपील कलोडे होते.


          उपस्थितांना मार्गदर्शन करतांना कलोडे यांनी विविध योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांनी घ्यावा व कौशल्य आधारित नविन उदयोग सुरु करण्याचे आवाहन केले.मार्गदर्शक जिल्हा अभियान व्यवस्थापक राहुल ठाकरे यांनी हिरकणी नवउदयोजक महाराष्ट्राची योजना, योजनेचा उदेश, स्पर्धेत भाग घेण्याच्या अटी व शर्ती, मानवविकास, चांदा ते बांदा, विदर्भ मराठवाडा वनधन विकास योजना, कृतीसंगम योजनेची माहिती दिली.

 कौशल्य विकास संचालक भयाजी येरमे यांनी कौशल्य विकास आधारित व्यवसायाची माहिती दिली. नरेश उगेमुगे यांनी माविम अंतर्गत रोपवाटीका, शेळीपालन, कुक्कुटपालन यावर मार्गदर्शन केले. शशिकांत मोकादे यांनी लघुउदयोगाविषयी माहिती दिली. 

          सदर कार्यशाळेला यशस्वी प्रभागसंघाच्या अध्यक्षा स्वाती आयलनवार, तुलसी प्रभागसंघाच्या अध्यक्षा वर्षा टाकलपल्लीवार, वृंदावन प्रभागसंघाच्या अध्यक्षा आरिफा बाबा भसारकर, प्रभागसंघ व्यवस्थापक चिरोली भावना कुमरे उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे संचालन प्रकाश तुराणकर, प्रास्ताविक शितल देरकर यांनी तर आभार हेमचंद बोरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राजु परसावार, निलेश जिवनकर, अमर रंगारी, कमलेश खाडे, मयुर भोपये, गिरिधर चरडुके यांनी सहकार्य केले. यावेळी कॅडर व महिला मोठया संख्येने उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!