शिवसेनेतर्फे उपजिल्हा रूग्णालयात वृक्षारोपन व फळवाटप.
शिवसेनेतर्फे उपजिल्हा रूग्णालयात वृक्षारोपन व फळवाटप.
मुल (प्रकाश चलाख)
शिवसेना तालुका मुल च्या वतीने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपुर्ण महाराष्ट्रात भगवा पंधरवाडा साजरा करून विविध कार्यक्रम घेतल्या जात आहे.
संपुर्ण महाराष्ट्रात उध्दव ठाकरे यांनी समाजोपयोगी कामाला वाव दिला आहे जसे पीक विमा व कर्जमुक्ती यालाच अनुसरून मुल तालुका शिवसेना प्रमुख नितीन येरोजवार याच्या नेतृत्वात भगवा पंधरवाडाच्या निमित्ताने मुल येथील उपजिल्हा रूग्णालयात जाऊन सर्व सुखसुविधा सुरळित आहे की नाही याबाबत वैघकीय अधिक्षक डाॅ बाबर यांच्यासोबत चर्चा केली त्यानंतर सर्व रूग्णाला बिस्किट व फळवाटप केली व तब्येतीची आस्थेने विचारपुस केली.
उपजिल्हा रूग्णालयात वृक्षारोपण करून वृक्ष लागवड संपुर्ण महाराष्ट्रात यशस्वी झाली पाहीजे असे शिवसेना तालुका मुल द्वारे आवाहन करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका प्रमुख शिवसेना नितीन येरोजवार, जेष्ठ शिवसैनिक सुनिल काळे, महेश चौधरी, अनिल सोनुले, संदिप चिताडे, सत्यनारायण अमरुदिवार, भास्कर खोब्रागडे, संदिप निकुरे, युवासेनेचे रितीक गोयल, ओमदेव मोहुर्ले, गंगा ईदुलवार देऊरवार ,सोमेश्वर रेड्डीवार ,मनोज मोहुर्ले, कु.कल्यानी निशानकर, श्वेता वन्नकवार शिवसैनिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!