ब्रम्हपुरी पोलिसांनी राबविले अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रम
ब्रम्हपुरी पोलिसांनी राबविले अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रम
ब्रम्हपूरी (यश कायरकर)
ब्रम्हपुरी तालूक्यातील बेटाळा(किन्ही)गावातील एका तरूणाचा दिर्घ आजाराने मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांचा जादुटोण्याना केल्याने मरण पावल्याचा आरोपावरून, म्रुतकाच्या वडीलाद्वारे जादूटोणा च्या संशयीताला मारहाण करण्यात आली. त्याबध्दल पोलीस ठाण्यात तक्रार करन्यात आली. तेव्हा गावातील लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे समजून पोलीस निरीक्षक मकेश्वर,पोलीस ऊप निरीक्षक मोरेश्वर देशमुख व त्यांच्या विभागाने या गावात दि.24 /7/19 ला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समीतीच्या माध्यमातून "अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम" आयोजित केला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून प्रा.हरिभाऊ पाथोडे सर, (महाराष्ट्र राज्य संघटक), यशवंत कायरकर (नागभीड तालुका सचिव,व वन्यजीव प्रेमी),व अनील लोनबले सर (सिंदेवाही तालुका सचिव) या चमू ने तिथे अंधश्रद्धा निर्मूलना बध्दल विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
श्री यशवंत कायरकर,यांनी वन्यजीव व अंधश्रद्धा या विषयावर मार्गदर्शन करताना... साप हा मानवाचा कसा मित्र आहे हे पटवून दिले,सोबतच साप व त्या बद्दल च्या अंधश्रद्धा यांचे निवारण केले, व अंधश्रद्धे मुळेच आपल्या देशात सर्पदंश चे जास्त प्रमाणात बळी कसे जातात हेही पटवून दिले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पाथोडे सर यांनी प्रयोगात्मक मार्गदर्शन करुन जादूटोणा हे फक्त थोतांड आहे, बुवाबाजी च्या नादी लागून परीवार उध्वस्त करु नये असे सांगितले. तर लोनबले सरांनी जादूटोणा विरोधी कायदा बद्दल माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून मकेश्वर साहेबांनी ही मार्गदर्शन केले. पुन्हा गावात अशा प्रकारच्या जादूटोणा च्या नावाने कोणत्याही प्रकारचा अनुचित घटना घडून येता कामा नये असेही सांगितले.गावच्या पोलिस पाटिलांनी आभार मानले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!