शासकीय शिक्षकांचा खाजगिरीत्या अवैद्य शिकवणी वर्ग
शासकीय शिक्षकांचा खाजगिरीत्या अवैद्य शिकवणी वर्ग
नेरी (शुभम बारसागडे)
जून महिन्यात शाळा, विद्यालय, महाविद्यालय च्या घंटा वाजल्या आणि शालेय परिसर विद्यार्थ्यांनी फुलून गेले. प्रत्येक विद्यार्थी हा नवीन वर्गात बसन्याचा नवीन अनुभव अनुभवत असताना त्यांच्या समोर प्रश्न आला तो वर्षभरातील शैक्षणिक खर्चाचा गणित. वह्या, बुक, पुस्तकें इतर खर्च आणि फिस हा सर्व खर्च तर होणारच परंतु, आपन चांगल्या टक्केवारीने पास होण्यासाठी शिकवनी वर्ग लावला पाहिजे हा समज आणि यातूनच शिकवनी वर्गाची हजारो रूपयाची फीस भरता भरता पालकांचे कंबरडे मोडनारी व न परवडनारी रक्कम आणि यातून गलेलठ्ठ होणारे खाजगिरीत्या शिकवणुकी वर्ग घेणारी मंडळी. आणि त्यातच शिकवनी वर्ग घेणाऱ्यांची स्पर्धा वाढत जाते.
आजच्या या आधुनिक युगात शिकवनी वर्गाचा नवीन फंडा बाजारात आला आहे. विद्यार्थी हा 10 वी, 12 वी ला गेला की चांगले मार्क मिळवण्यासाठी शिकवनी वर्ग लावलेच पाहिजे अशी मानसिकता आजच्या विद्यार्थ्यात बिंबवली गेली आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी ह्या खाजगी शिकवणी वर्ग च्या मागे धावताना दिसतो. याला कारण म्हणजे वर्गात चांगल्या प्रकारे अध्यापन केले जात नाही असा असावा का? की शिकवनी वर्ग लावण्यासाठी विध्यार्थ्यांना भाग पाडावे असा असावा. विज्ञान शाखेतील विद्यार्त्यांनी विषय शिक्षकाकडे शिकवनी वर्ग लावावे असा कयास पाल्याचा आणि पालकांचा असतो. कारण त्यामागे सुद्धा एक दम दाटी असते. की प्रॅक्टिकल चे मार्क्स मिळणार नाही. अश्या चर्चा पालकांत आणि पाल्यात ऐकायला मिळतात. यात शासकीय नोकरीवर असणारे शिक्षक खाजगिरीत्या अवैध शिकवनी वर्ग घेतात. हेच शिक्षक वर्गात लक्ष पूर्वक शिकवीत नाही अशी चर्चा आहे. त्यामुळे विद्यार्थी शासकीय शिक्षकाकडे पैसे देऊन खाजगिरीत्या वर्ग लावतात. या शिक्षकांना गलेलठ्ठ पगार आणि पुन्हा शिकवनी वर्गाचा भरपूर पैसा याला जवाबदार कोण? या सगळ्या प्रकारात नुकसान होते ते गरीब विद्यार्थ्यांचे जांच्याकडे वर्ग लावायला पैसा नाही. त्यांना मोफत वर्गालाही कोणी बोलवीत नाही. ह्या सगळ्या प्रकारामुळे गरीब, होतकरू, हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होते. तसेच जे मुले शिकवनी लावतात त्या सर्वाना चांगले मार्क्स मिळतात का? तर नाही असे उत्तर मिळेल. कारण शिक्षक त्यांची हमी घेत नाही फक्त पैसे कमविण्यासाठी शिकवनी वर्गाचा वापर करतात. या मागे पैसे कमविणे हा एक मात्र उद्देश्य असते. याला जवाबदार कोण तर शिक्षण विभागाने या बाबीकडे लक्ष द्यायला पाहिजे. परंतु याकड़े दुर्लक्ष असते असे पालक वर्ग बोलताना दिसतात.
हेच शिकवनी वर्ग जर सुशिक्षित बेरोजगार ने घेतले तर त्याला व त्याच्या कुटुबाला आधार मिळेल. मात्र काही मोजकेच बेरोजगार हे वर्ग घेत असतात. कारण विद्यार्थ्यांच्या मनावर तसे बिंबवले जाते. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगाराकडे कोणी जात नाही असे बोलल्या जात आहे. त्यामुळे आता तरी या गंभीर बाबीची दखल सबंधित विभागाने घ्यायला पाहिजे. तालुक्यात अश्या शिकवनी वर्गाचा सुळसुळाट सुरु झाला असून त्यावर अंकुश लावायला पाहिजे. जेणे करुण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
(शुभम बारसागडे)
नेरी/खुटाळा



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!