मुरपार वेकोली येथे हजारो टन मातीमिश्रित कोळसा पडून
मुरपार वेकोली येथे हजारो टन मातीमिश्रित कोळसा पडून
जास्त कि.मी. च्या अंतरामुळे कोळसा घेण्यास ठेकेदाराचा नकार
जांभुळघाट : - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
जांभुळघाट : - चिमूर तालुक्यातील मुरपार - मिंझरी येथे भूमिगत खोळसा खदान मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. तेव्हा कोळसा चांगला उत्तम प्रतीचा निघत असून, जवळपास कोळसा मिळत नसल्यामुळं मुरपार खदान मधून दिवसातून 10 ते 15 च्या जवळपास ट्रक भरून वाहतूक होत होती. मात्र आता मागील एक वर्षांपासून हि कोळसा खदान मागे आली असून, या खदानीत हजारो टन कोळसा पडून आहे. पण कोळसा हा मातीमिश्रित असल्याकारणाने, कोणी ठेकेदार घ्यायला फिरकतच नसल्यामुळं डेपो मॅनेजर सिंग सह कर्मचारी मनस्ताप करीत असतात. कोळसा खदान भूमिगत असून आता बऱ्याच प्रमाणात कोळसा निघायला सुरवात झाली आहे. मात्र कोळसा घेण्यास कोणीच ठेकेदार येत नसल्यामुळं हजारो टन कोळसा विक्रीच्या शोधात आहे. चंद्रपूर, उमरेड तालुके जवळपास लागून असून, चंद्रपूर जवळील वरोरा (माजरी) येथे वेकोली असल्यामुळं कोळश्याची वाहतूक या ठिकानातूनच केली जाते. तर उमरेड जवळील नांद जवळ मोठी कोळसा खदान असल्याकारणाने तिकडील ठेकेदार हे त्या नांद च्या खदान मधून कोळसा वाहतूक करतात. या मुरपार खदान मधून कोळसा नेणे म्हणजे ठेकेदारांना वाहतूक करायला परवडत नसल्यामुळं येथील हजारो टन कोळसा पडून आहे.
500 च्या जवळपास कर्मचारी, त्यांचे काम मात्र लयभारी
या मुरपार - मिंझरी भूमिगत कोळसा खदानमध्ये 500 च्या जवळपास कर्मचारी असून करोडो रुपये या कर्मचार्यावर केंद्र शासन खर्च करते. मात्र 500 मधून फक्त 200 च्या जवळपासच कर्मचारी या ठिकाणी काम करतात. बाकीचे तर अनेक कारणं सांगून कामावर येतच नसल्याचे मॅनेजर सिंग सांगत होते.
तर मुरपार मिंझरी कोळसा खदान बंद करण्याची गावकाऱयांची मागणी
हि खदान गावकार्याना त्रासदायक झाली असून, अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या खदानमूळ गावातील नागरिकांना काम मिळेल व गावातील बेरोजगारी दूर होईल असे येथील गावातील नागरिकांना वाटत होते. मात्र इथे झाले उलट याठिकाणी समस्यां दूर न होता उलट समस्यां वाढत जात असल्याचे मत वनासमितीचे अध्यक्ष ननावरे सांगत होते. गावात अजून बेरोजगारी वाढली आहे. तर पाण्याचा ज्वलंत प्रश्न भासला आहे. या खदानमूळ पाणी अजिबात मिळत नसून गावकरी खदान बंद करण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात उभे ठाकले आहेत.हि कोळसा खदान उदयास आली, तेव्हा पासून गावकार्याना त्रासदायक ठरली असल्याचे मुरपार गावातील नागरिक सांगतात.
तर खदानीतून निघालेला कोळसा कोणत्या ग्रेड चा याबाबद्द संभ्रमंच
मुरपार भूमिगत कोळसा खदान मधून निघालेला कोळसा कोणत्या ग्रेड मध्ये आहे याबाबद्द पबलीक पंचनामा प्रतिनिधींनी प्रतिक्रिया जाणून घेतले असता, खदानचे मॅनेजर सिंगसह कर्मचारी याबाबद्द संभ्रमात असून, खदान मॅनेजर सिंग सांगतात की निघालेला कोळसा हा "ए" ग्रेड चा आहे. तर कर्मचार्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर ते सांगतात कि हा कोळसा "सी" ग्रेड चा असल्याचे सांगत होते. हजारो टन कोळसा मातीमिश्रित असून सुद्धा कोळसा "ए" ग्रेड चा असल्याचे प्रतिनिधी जवळ सांगितले जात आहे. यावरून असे दिसत होते की, मॅनेजर सिंग हे सावरासावर करीत असल्याचे दिसून आले.
प्रतिनिधींना फोटो काढण्यास मज्जाव
मुरपार कोळसा खदान येथे सर्च ऑपरेशन करण्यासाठी गेले असता, हजारो टन कोळसा पडून दिसल्याने यावर चर्चा केली असता, कोळश्याची पाहणी केली असल्यावर कोळसा माती मिश्रित असल्याचे यावेळी दिसून आले. बातमी प्रकाशित कारण्यासाठी फोटो घेण्यास गेले असल्यावर तेथील फोटो काढण्यास मज्जाव केला होता यावर मज्जाव का करण्यात येत आहे. याबाबद्द विचारले असता, वरिष्ठ अधिकाऱयांनी चौकशी केली की आम्हाला फाईल वर घेतात असे कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!