राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चिमूर शहर अध्यक्ष पदी मंगेश बारापात्रे नियुक्ती

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चिमूर शहर अध्यक्ष पदी मंगेश बारापात्रे नियुक्ती


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - चिमूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी मंगेश नारायण बारापात्रे यांची नियुक्ती  चिमूर विधानसभा अध्यक्ष सुरेश रामगुंडे  यांचे शिफारशी नुसार राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी नियुक्ती पत्र देऊन केली आहे .
             चिमूर  येथील  रहिवासी व युवक नेतृत्व करणारे तरुण कार्यकर्ते मंगेश बारापात्रे  यांची नियुक्ती राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी नियुक्ती पत्र देऊन चिमूर शहर  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे .
          पक्षाचा व युवक संघटनेचा अधिक विस्तार करून दिलेली जवाबदारी निष्ठेने पार पाडून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे विचार समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याची व पक्ष संघटना बळकट करणेची जबाबदारी मंगेश बारापत्रे  यांचेवर चिमूर शहर  राष्ट्रवादी युवक कांग्रेसचा अध्यक्ष म्हणून देण्यात आली आहे.
                 यांचे नियुक्ती बद्दल चिमूर विधानसभा अध्यक्ष सुरेश रामगुंडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष योगेश ठुने ,चिमूर तालुका युवक राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष अजय चौधरी, सुधीर मांडवकर ,लक्ष्मण मांडवकर ,रमेश खेरे आदींनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!