मूल येथे कारगील विजय दिन संपन्न



मूल (अमित राऊत)
माजी सैनिक संघटना तथा भरारी माजी सैनिक महिला बचत गट मूल  यांच्या संयुक्त विध्यमाने अमर विरांच्या सन्मानार्थ 26 जुलै कारगिल विजय दिवस निमित्याने शाहिद स्मरणार्थ कार्यक्रम मुल शहरातील मा. सा. कन्नमवार सभागृहात आयोजित केला होता. 
   देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ,  त्या दिवसाची आठवण ठेऊन विध्यार्थ्यांनी देशाप्रती सामाजिक भावना  ठेऊन भविष्यातील काम करतील. हा उद्देश यावेळी सांगण्यात आला. 
     य कार्यक्रमात मुल च्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर,  सुभेदार शंकर मेंगरे सिद्धार्थ डांगे, दिनेश मोगरे, सुरेश बोबाटे, एकनाथ गडेकर,  अंजली सुर, श्री साई मित्र परिवारचे अध्यक्ष विवेक मुत्यलवार आदी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांनी कारगिल दिवसाबद्दल माहिती सांगून देशाप्रती असलेला प्रेम व्यक्त केले.  
यावेळी माजी सैनिकांनी आपल्या सैनिकांच्या पगाराच्या पेन्शनच्या समस्या,  राहण्याचा प्रश्न असे प्रश्न उपस्थित करून सरकार यावर लक्ष द्यावे असे सांगितले.
कार्यक्रमात कला निकेतनच्या मंचाने देशभक्तीपर गिते सादर करून वीर जवानांची आठवण करून दिली.
    या कार्यक्रमात मुलच्या शासकीय अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले होते,  मात्र त्यांच्या व्यस्त कामामूळे एकही अधिकारी येऊ शकले नसल्याने काही लोकांनी नाराजी व्यक्त केली.
या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ गडेकार,   संचालन आशा चलाख तर आभार के.टी.खोब्रागडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!