जनता विद्यालय नेरी येथे करिअर व व्यवसाय मार्गदर्शन
जनता विद्यालय नेरी येथे करिअर व व्यवसाय मार्गदर्शन
शुभम बारसागडे/ नेरी(चिमूर):
लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरी या संस्थेच्या 50 वर्षाच्या यशस्वी वाटचाली निमित्य ही संस्था सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळा साजरा करत आहे.या सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर प्रत्येक महिन्यात विविध बौद्धिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम घेण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत दिनांक 31 जुलै 2019 रोज बुधवारला विद्यार्थ्यांना आपले चांगले करिअर घडवण्यासाठी व आपण कोणत्या व्यवसायात प्रगती करू शकतो याचे मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शक व व्याख्याते म्हणून प्रसिद्ध व्यवसाय मार्गदर्शक डॉ.संजय भांडारकर सर, प्राचार्य, भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालयल लखमापूर बोरी,मराठी विज्ञान परिषद अध्यक्ष, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ गडचिरोली जिल्हा तसेच वैदिक गणित अभ्यासक उपस्थित होते. या वेळी त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आपली आवड, छंद, क्षमता, स्वप्ने,संधी यांचा मेळ घालून आपला करिअर कसा करावा याचे मार्गदर्शन अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने, चलचित्राच्या माध्यमातून व कृतीयुक्त पद्धतीने केले. तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्याकरिता व्याख्यान दिले. हा कार्यक्रम शाळेच्या स्व. विक्रांत विष्णुकांत बिरेवार या सभागृहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष टी. एल. पिसे, प्रमुख अतिथी सु. दा. पिसे, मुख्याध्यापक एस. एन. येरणे, पर्यवेक्षक कु. बी. के. बमनोटे, सौ. भांडारकर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. भांडारकर यांचे सर्व उपस्थित पाहुण्यांनी संस्थेतर्फे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समनव्यक एन. एस. वर्धलवार, उपसमनव्यक, एस. पी. पंधरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. एस. चौधरी यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!