अ स्व ला चा विद्यार्थी निवर हमला.
मुल (प्रकाश चलाख)
मुल येथील कर्मवीर महाविद्यालयात शिकत असलेल्या निशा नारायण सोनुले या विद्यार्थिनीवर दडून बसलेल्या अस्वलाने हल्ला केल्याने ती गंभीररित्या जखमी झाली .ही घटना मंगळवार दिनांक 30 रोजी महाविद्यालयात घडली.
निशा नारायण सोनुले ही विद्यार्थिनी कर्मवीर महाविद्यालय मुल येथे शिक्षण घेत आहेत. नेहमीप्रमाणे ती महाविद्यालयात उपस्थित झाली . लघुशंका आल्याने ती कॉलेजच्या स्वच्छतागृहात सकाळच्या सुमारास गेली असता तिथे दडून बसलेल्या अस्वलाने तिच्यावर हल्ला केला .या त ती गंभीररित्या जखमी झाली. सदर बाब लक्षात येताच कॉलेज प्रशासन, वनविभाग यांनी तातडीने मदत केली.
अस्वलाच्या हल्ल्यात तून सुटका झाल्यानंतर लगेच तिला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर वन विभागाच्या वाहनाने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
कॉलेज परिसर हा वन विभागाला लागून असल्यामुळे या ठिकाणी जंगली प्राण्यांचा वावर आहे. याअगोदरही महाविद्यालय परिसरात अस्वलाने आपले पिलांसह दर्शन दिले आहे. या परिसरात होत असलेल्या वन्यप्राण्यांच्या हंल्याने लगतच्या नागरिकांत तसेच महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.
भविष्यात सदर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वनविभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी विद्यार्थी तसेच लगतच्या नागरिकांची मागणी आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!