सततधार पावसामुळे शंकरपूर येथील अनेक घरांची पड़झड़

सततधार पावसामुळे शंकरपूर येथील अनेक घरांची पड़झड़


शंकरपूर (जगदीश पेंदाम)

             येथील मागील चार दिवसापासून सततधार येणाऱ्या वादळी पावसामुळे शंकरपूर व परिसरातील विविध ठिकाणची घरे व काही लोकांची गुरांची गोठेयांची पड़झड़ झाली असून अनेक लोकांचे आर्थिक नुकसान झालेली आहे. योगायोगाने यात जीवित हानी झालेली नाही.
               मागील चार दिवसापासून परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे यात शंकरपूर येथील विविध घरे पडली असून अनेक घरामध्ये पाणि घुसले आहे. अनेकांनी घरातील पाणि फेकण्यासाठी रात्र जागुन काढल्या आहेत. यात शंकरपूर येथील संजय ढोक, बाळकृष्ण ढोक, शालीक लहाने, अनंता येळने, विनोद वांढरे, रामदास वांढरे, उषाबाई रासेकर, गुरुदास डबरे, जनाबाई भजभूजे, रमेश लहाने, किशोर बोधे,ममता डांगे, गुरू चौधरी, डोमळाबाई शेरकी, बाबूराव सावसाकड़े, सरस्वती जांभूळे, सुभद्रा सावसाकडे, कल्पना रासेकर या अनेक लोकांची घरे पडली असून यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तर अनेक लोकांच्या जिवनोपयोगी वस्तु मलब्यात दबलेल्या असून नागरीकांच्या सहकार्याने त्या काढण्यात आल्या आहेत.सध्या काहींनी शेजारील घरी तर काहींनी नातेवाईकांच्या घरी तात्पुरता आसरा घेतला आहे.


             शासन घरकुल योजना राबवित असले तरी यात कोणतेही नियोजन नाही. गरजवंताला घर मिळत नाही. व काही लोक आपण दारिद्र्य रेषेखाली आहोत याचा फायदा घेत वडिलांच्या नावाने वेगळे घर व मुलांचे नावाने वेगळे घर, याचा फायदा काही नागरिक घेत आहेत. शासनाने आतातरी गरज त्याला घर दिले तर लोकाना या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. गरज त्याला घर ही योजना राबवावीं व पड़झड़ झालेल्या घरांच्या  नुकसानीची लवकरात लवकर शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!