गरीब लोकांच्या शाळकरी मुलांना जूते देऊन केले वाढदिवस साजरा
गरीब लोकांच्या शाळकरी मुलांना जूते देऊन केले वाढदिवस साजरा
नवरगाव (अमोल निनावे)
समाजामधे राहत असताना काही समाजाकडून घ्यावा लागतो तर काही परतफ़ेड करावे लागतो याची प्रचोती श्री मनोजभाऊ डुंबरे यांनी आज त्यांच्या अभिषेक नावाच्या मुलाच्या "वाढदिवसा"प्रसंगी शाळकरी मुलांना बूट वाटप करुण दिली आहे. 'सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे, खंदे समर्थक असणारे सतत सामाजिक कार्य करणारे श्री मनोज डुंबरे हे वेवसायाने सोन्या चांदीचे नवरगावला व्यापारी आहेत.त्यांच्या मनात लहानपनापासून समाजातील गोरगरीब लोकांन् बदल आदरभाव आहे.त्यामुळे त्यांनी या वर्षी आपल्या मुलाचा वाढदिवस हा थाटा माटाने न करता गरीब लोकांच्या शाळकरी मुलाना बूट वाटप करुण त्याचा सोबत साजरा करायचे ठरविले व् त्याप्रमाणे आज दिनांक 31/7/2019 ला जिल्हा परिषद पळसगाव जाट या शाळेतील गरीब मुलांना बूट व् साक्स वाटप करुण 12 वा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा केला.यामुळे समाजात तसेच नवरगाव परीसरामधे श्री मनोज डुंबरे यांचे आभार व् कुतूहल वक्त होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!