शिवनी वासेरा रोडचे नितकृष्ट् बांधकाम आले चवाट्यावर
शिवनी वासेरा रोडचे नितकृष्ट् बांधकाम आले चवाट्यावर
नवरगाव (अमोल निनावे)
सतत तीन दिवसा पासून मुसळधार पावसानी विदर्भात हजेरी लावलेली आहे.त्यामुळे अनेक शेतकरी सुखवलेला दिसून येत आहे. मात्र सिंदेवाहि तालुक्यातील शिवनी वासेरा रोड ची अवस्था पूर्णपणे बिकट झालेली आहे.आताच बनवलेल्या डांबर रोडला मधेच भगडाळ पडल्याने या रोड़ाच्या बांधकामाविषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या रोडाचे ज्या ठेकेदाराणी बांधकाम केले आहे त्या ठेकेदारचे लाईसन रद् करण्यात यावे असे ही काही ग्रामस्त्य लोकांकळून मागणी होत आहे.या वरुण एकंदरित सरकारच्या अश्या नितकृस्ट बांधकामावर्ती रोष निर्माण होत आहे. तसेच जे लोक आज बाजार करण्याकरिता शिवनी ते नवरगाव वरुण वासेराला जात अस्ता त्यांना मधेच आपली गाड़ी ठेवून स्वताच्या डोक्यावर्ती आपला विक्री करीता नेलेला माल न्याव लागलेला आहे.तसेच अनेक येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशाना व् ग्रामस्थ लोकांना व् शाळकरी मुलांना येजा करण्याकरिता या रोड चा त्रास होत आहे.तरी याकडे लवकरात लवकर लक्ष्य प्रशाष्णाने देऊन पूर्वरत करावे अशी मागणी ग्रामस्थ लोकांकडून होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!