सुकलेले धान पऱ्हे पाहून शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

सुकलेले धान पऱ्हे पाहून शेतकऱ्यांनी  केली आत्महत्या


शंकरपुर (जगदीश पेंदाम)
              
                येथील रहिवासी असलेल्या  एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून ही घटना काल रात्री उघडकीस आली.
 रविंद्र सोनबाजी लहाने (४८) हे नेहमी प्रमाणे सकाळी शेतावर गेले होते परंतु रात्री आठ वाज पर्यंत घरी न आल्याने घरच्या लोकांनी शोधाशोध केली त्यावेळी शेताच्या बाजूने असलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला त्याच्यावर बँक व खाजगी बँकेचे कर्ज आहे.  दररोज सकाळी ते वडिलोपार्जित असलेल्या  पावणे दोन एकर शेतावर जात असून, इतर वेळात दुसर्यांच्या शेतावर मजुरी करायला जात होते.
      पण पाण्याअभावी घरच्या शेतातील धान परे मरत असल्याचे त्यांना  दिसून येत होते. आपली शेती या वर्षी पिकणार नाही. त्यामुळे शेती व मुलीच्या लग्नाचे  कर्ज फेडावे कसे या प्रश्नांनी त्याला ग्रासले होते.
        आधीच मुलीच्या लग्नाचे कर्ज व शेतीचे कर्जामुळे तो आर्थिक विवंचनेत सापडलेला  होता. जर चार दिवसात पाणि आला नाही तर आम्हा शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या शिवाय पर्याय नाही असे तो  मागील चार पाच दिवसा पासून बोलत होता. अशी चर्चा वार्डlत व गावात होती.
        घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे त्यांच्या मागे वृध्द आई, पत्नी दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून  तलाठ्याचा संप असून सुद्धा  तलाठी आत्राम व तोड़ासे  यांनी घटनेचे गांभीर्य समजुन म्रुतकाच्या घरी भेट देऊन  घटणास्थळाचा  पंचनामा केला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटूंबावर आर्थिक संकट कोसळल्याने शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नागरीका कडून होत आहे.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!