नवरगाव ग्राप हे प्रभारी ग्रामसेवकच्या भरोशावर

नवरगाव ग्राप हे प्रभारी ग्रामसेवकच्या भरोशावर                  
 नवरगाव हे पंधरा हजार लोकसंख्या पेक्षा जास्त लोकसंख्या असणारा मोठा गाव आहे मात्र या सहा महिन्या पूर्वी श्री. शेंडे ग्रामसेवक हे निलंबित झाले तेव्हापासून दोन ग्रामसेवक प्रभारी सतत एका पाठोपाठ एक रुजू करण्यात आले. त्यामुळे नवरगाव मधे प्रभारी ग्रामसेवक पूर्ण वेळ नवरगावला देऊ शकत  नाही. आठवड्यातून फक्त एक किवा दोन दिवस हजर रहतात.       अशातच अनेक लोकांच्या ग्रामपच्यात मधील कागदी कामे रखड़त असल्यामुळे नवरगाव येथील सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेच्या वतीने नवरगावला कायम स्वरूपी ग्रामसेवक द्यावे  अशी मागणी होत आहे.               नवरगाव मध्ये होत असलेल्या नळाच्या समश्याकड़े पूर्णपणे दुर्लक्ष्य होत आहे.  सरकारी नियमानुसार नळाला टिल्लू पम्प लावता येत नाही मात्र नवरगावला घरो घरी टिल्लू पम्प लावल्या मुळे ज्यांच्या घरी टिल्लू पम्प नाही अश्या लोकांकडे नळाचा पानी जात नाही त्यामुळे ग्रामपच्यात ला वेळोवेळी सुचना देऊन सुद्धा कोणीच सदश्य किवा सरपंच समोर होऊन गावात फिरत नाही त्यामुळे अनेक लोकांच्या नळाच्या पाण्याच्या समस्या आहेत. ग्रामसेवक स्थानिक नसल्यामुळे आम्ही कस गावात फिरू असे ग्राम सभे मधे संगीतल्या जाते जो पर्यन्त ग्रामसेवक नवरगावला स्थानिक राहणार नाही तोपर्यन्त टिल्लू पम्प किवा अनेक कामे गरीब लोकांचे अडकून राहणार त्यामुळे लवकरात लवकर प्रशाषणाने स्थानिक व कायमस्वरूपी ग्रामसेवकांची नियुक्ति करावी अशी मागणी सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेच्या वतीने होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!