सिरोंचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
सिरोंचा तालुक्यातील वाढत असलेल्या समस्यांवर मात देण्याकरिता तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुढाकार उपविभागीय अधिकाऱ्याकडे निवेदन सादर
अहेरी (सेवा पवार)
दिनांक 23 जुलै 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका सिरोंचा च्या वतीने उपविभागीय अधिकारी अहेरी यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात मध्ये सिरोंचा तालुक्यातील अनेक गंभीर समस्यांचे उल्लेख केला आहे.
👉सतत खंडित होत असलेला वीज पुरवठा.
👉वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे
प्रशासकीय ऑनलाइन काम पूर्ण होत नाही.
👉महावितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालय असून सुद्धा त्या समस्यांनाकडे लक्ष नाही.
👉वैद्यकीय सुविधांचे कमतरतेमुळे नागरिकांना होणारा त्रास.
👉ग्रामीण रुग्णालयात वाढत असलेल्या समस्या.
👉नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी तेलंगाणा राज्यात पाठविले जाते.
👉नगर पंचायत सिरोंचा येथे पुर्णवेळ मुख्याधिकाऱ्याची मागणी.
👉मुख्यकधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना होणार त्रास.
असे विविध प्रकारच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले.यावेळी तालुका अध्यक्ष मधुकरराव कोल्लूरी, तालुका उपाध्यक्ष सलाम सत्तार, पंचायत समिती उपसभापती रिकुला कृष्णमूर्ती, एम.डी.शानु उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!