आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
वरोरा - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - वरोरा महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी दहेगाव जवळच्या चिकणी या गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेवून गावकऱ्यांना वृक्षारोपणाचा संदेश दिला.या प्रसंगी गावतून वृक्षदिंडी काढण्यात आली,शाळेच्या व गावाच्या परिसरात झाडे लावून, पर्यावरण संगोपनाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी गावकर्यांना पटवून सांगायचा प्रयत्न केला.'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' या संकल्पनेला अनुसरून आनंद निकेतन कृषि महाविद्यालय,आंनदवन वरोरा,येथील विद्यार्थिनी चैताली दुधे, निलिमा बारेकर, श्रद्धा गुजरकर,अमृता डहाके,रागिनी धांडे,या विद्यार्थिनींनी हा उपक्रम राबावला,या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच वेणूताई उर्कुडे आणी ग्रामसेवक वांडरे,जिल्हा परिषद शाळा,चिकणी चे मुख्याध्यापक आसेवार सर,शाळा समिती अध्यक्ष रमेश झाडे आदि गावकरी तसेच शाळेचे चिमुकले विद्यार्थी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!