गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार .
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार .
अहेरी (सेवा पवार)
पावसाने नदी व नाले भरुन वाहत असल्याने अनेक गावे संपर्काच्या बाहेर..विज पुरवठा ठप्प,दूरध्वनी सेवा खंडीत आहे.
गडचिरोली:-गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आलापल्ली - भामरागड , आष्टी-आलापल्ली-अहेरी मार्ग बंद असून,सिरोंचा, भामरागड व अहेरी तालुक्यातील शंभर पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे.
तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे. काल रात्री पासुन आणि आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडल्याने नद्या व नाले दुथडीने भरुन वाहत आहेत. चामोर्शी तालुक्यातील दिना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने चौडमपल्ली नाल्याला पूर आल्याने आष्टी-आलापल्ली-अहेरी मार्ग बंद झाला आहे. छत्तीसगड राज्यातील जगदलपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्याने भामरागड तालुक्यातुन जवळून वाहणारी इंद्रावती नदी फुगून भरुन वाहत आहे.
भामरागड तालुका ठिकाणीचा जवळ पर्लकोटा नदी पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आलापल्ली-भामरागड रस्ताही बंद झाला आहे. भामरागड तालुक्यातील दूरध्वनीसेवा व वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.अहेरी तालुक्यातील पेरमिली जवळ नाल्याचा पुलावरुन पाणी वाहत असल्याने पेरमिली-भामरागड मार्ग बंद आहे.
अहेरी जवळील गडअहेरी पुलावरुन पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असुन अहेरी तालुक्यातील देवलमरी-व्यंकटापूर, तसेच अहेरी-महागाव हा रस्ताही पुरामुळे बंद झाला आहे.शेवटी आलापल्ली-सिरोंचा मार्गही बंद झाला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!