मॅजिक बस इंडिया फाउंडेशच्या वतीने मुख्याध्यापकांची कार्यशाळा संप्पन
मॅजिक बस इंडिया फाउंडेशच्या वतीने मुख्याध्यापकांची कार्यशाळा संप्पन
मुल (अमित राऊत)
मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे याच्या मार्गदर्शनात व नियंत्रणात दिनांक २७ जुलै २०१९ रोज शनिवार ला पंचायत समिती सभागृह मुल येथे एक दिवसीय मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मुल तालुक्यातील ६५ शाळेमध्ये आणि ४२ गावामधे ११ ते १४ वर्ष वयोगटातील विद्यार्थांसाठी स्वव्यवस्थापन, सांघिककार्य, संवादकौशल्य, समस्यांची सोडवणूक, अनुभवात्मक शिक्षण त्या सोबतच लिंग समानता आणि शिक्षणाचे महत्व खेळाच्या माध्यमातून शिकविल्या जातात. त्याच अनुषगाने "खेळा द्वारे विकास" हा कार्यक्रम प्रत्येक मुख्याध्यापकांना समजावा या साठी हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यासोबतच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडाळा येथे खेळाच्या मध्यामतून कसं विद्यार्थ्यांना शिवल्या जाते त्याच प्रात्यक्षिक करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रशांत लोखंडे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर हे अध्यक्ष म्हणुन लाभले. तर उद्घाटक म्हणून पूजा डोहने सभापती पंचायत समिती मूल यांची उपस्तिथी होती त्याचसोबत सहउद्घाटक म्हणुन संध्या गुरूनुले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर यांची विषेश उपस्तिथी होती. त्यासोबतच कपिल कलोडे संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मूल यांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती होती, प्रशिक्षक म्हणून लाभलेले संदीप राऊत, केंद्र प्रमुख- दयाराम भाकरे सर, यशवंत गेडाम सर, चावरे सर इत्यादी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळा साहाय्यक अधिकारी निखिलेश चौधरी यांनी केले, तर सर्व पाहुण्यांचे आभार आकाश गेडाम यांनी मानले.
छाया वरभे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडाळा व सर्व शिक्षकवृंद, शिलाताई दहीवले सरपंच ग्रामपंचायत ताडाळा, मॅजिक बसचे कर्मचारी संदेश रामटेके, योगिता सातपुते, संदेश चुनारकर, दिनेश कामतवार, शुभांगी रामगोनवार यांच्या अथक परिश्रमानी कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!