जामखुर्द चे सरपंच बंडु बुरांडे यांचा जि.प.अध्यक्ष देवराव भोंगडे यांच्या हस्ते सत्कार

जामखुर्द चे सरपंच बंडु बुरांडे यांचा जि.प.अध्यक्ष देवराव भोंगडे यांच्या हस्ते सत्कार .. 
पोंभूर्णा (जवाहर धोडरे)
  पोंभूर्णा तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत जामखुर्द येथील निवडणूकीत भाजपाचे बंडु बुरांडे हे सरपंच पदी भरघोस मताने विजयी झाले .त्या निमित्त पोंभूर्णा येथे 28 जुन ला सांयकाळी 6 वाजता सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  .या कार्यक्रमात जामखुर्द चे नवनिर्वाचित सरपंच बंडु  उर्फ धनराज बुरांडे यांचा जि.प.अध्यक्ष देवराव भोंगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात भाजपाचे  जेष्ठ नेते प्रमोद कडु ,सुदेश कापरर्तीवार ,संघटन प्रमुख राम लखिया , भाजपा तालुका अध्यक्ष गजानन गोरंटिवार , सरचिटनीस ईश्वर नैताम ,पंचायत समिती उपसभापती विनोद देशमुख ,नगराध्यक्ष श्वेताताई वनकर ,पाणीपुरवठा व आरोग्य सभापती सुनिता मँकलवार ,शिक्षण सभापती मोहन चलाख ,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अजय म्हस्के ,सरचिटनीस रोशन ठेंगने ,मांडवगडेजी ,  माजी सरपंच संजय कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्राम विकासाकरिता आपण कटीबद्ध असल्याचे अभिवचन नवनिर्वाचित सरपंच बंडु उर्फ धनराज बूरांडे यांनी उपस्थितांना दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!