अनुदानित कृषी साहित्याचे प्रस्ताव पूर्वसमतीत अडकले ; शेतकऱ्यांत तीव्र नाराजी.

अनुदानित कृषी साहित्याचे प्रस्ताव पूर्वसमतीत अडकले ; शेतकऱ्यांत तीव्र नाराजी.


मुल (प्रकाश चलाख)

 शासनातर्फे शेतकऱ्यांना अनुदानावर  देणाऱ्या कृषी  साहित्याचे प्रस्ताव तालुका कृषी विभागाच्या पूर्वसंमती प्रक्रियेत अडकल्याने अनेक शेतकऱ्यांचे पीव्हीसी पाईप व इतर साहित्य  घेण्याची प्रक्रिया रखडली असल्यामुळे कृषी विभागाच्या कार्यशैली बद्दल अनेक शेतकऱ्यांनी  तीव्र नाराजी  व्यक्त केली आहे.

 महाराष्ट्र शासनातर्फे कृषी विभागांतर्गत "उन्नत शेती- प्रगत शेती" योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी अवजार  खरेदी करण्याची परवानगी दिल्या जाते. पूर्व संमती मिळाल्यानंतर कृषी अवजारांचे अनुदान संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर कृषी विभागामार्फत रक्कम जमा केल्या जाते. संबंधित कृषी अवजार खरेदी करण्या अगोदर  त्या अवजाराचे अनुदान कृषी विभागाकडून प्राप्त करण्यासाठी रितसर कृषी विभागाकडे अर्ज दिला जातो. अनेक शेतकऱ्यांनी कृषी अवजार खरेदीसाठी आपले प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी मूल, यांच्या कार्यालयात सादर केलेले आहे . कृषी अवजार खरेदी करण्या साठी कृषी विभागाची पूर्वसंमती आवश्यक असते. कृषी विभागाकडून अनेक शेतकऱ्यांना पूर्वसंमती न मिळाल्यामुळे  व नव्याने ऑनलाइन अर्ज व सोडत पद्धतीचा  फतवा निघाल्याने कृषी अवजारे खरेदी करण्यास विलंब होत असून ऐ न खरीप हंगामात कृषी अवजारे खरेदी करण्यास पूर्वसंमती  मिळत नसल्यामुळे  कृषी विभागाच्या कार्यशैली बदल  तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी   शंका-कुशंका  व्यक्त केली आहे.

 सध्या  खरीप शेतीचा हंगाम सुरू झाला असून अनेक शेतकऱ्यांना कृषी    साहित्याची गरज असते. ऐन हंगामातच कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्यामुळे शेतकऱ्यांना कृषी साहित्य घेण्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असून अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

 तालुक्यात या हंगामात म्हणावा तसा पुरेसा पाऊस न झाल्यामुळे व गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात होत होत असलेल्या पावसाने  शेतकरी जरी सुखावला असला तरी पाण्याची जुळवाजुळव ही नित्याचीच बाब या परिसरातील शेकऱ्यांची आहे.   या वेळेला शेतातील पिके करपली आहेत. नेहमी पाण्यासाठी जुळवाजुळव  करावी लागत असून   तालुक्‍यातील शेतकऱ्यांची स्थिती विदारक आहे.

 संबंधित प्रकाराबाबत तालुका  कृषी  अधिकारी  श्री गायकवाड मुल  यांच्याकडे दूरध्वनी वरून संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.  नंतर पूर्वसंमती  विभागाकडे संपर्क केला असता शेतकऱ्यांचे गेल्या दोन वर्षापासून चे कृषी साहित्याचे प्रस्ताव धूळ खात पडून असल्याचे सांगितले. तसेच पीव्हीसी पाईप खरेदीची प्रक्रिया  परत ऑनलाइन अर्ज करून सोडत पद्धतीने काढण्यात   येणार असल्यामुळे विलंब होत असल्याचे कृषी अधिकारी कार्यालयातील  श्री.डोंगरे (पूर्वसंमती विभाग) मुल ,  यांनी सांगितले.

 कृषी साहित्यांची खरेदीची प्रक्रिया  कृषी विभागाच्या सोडत पद्धतीत अडकले असल्याने प्रस्ताव सादर केलेल्या शेतकऱ्यांना  सोडत पद्धतीची वाट पहावी लागणार असल्याने प्रस्ताव सादर केलेल्या शेतकऱ्यांनी  सुरुवातीला अर्जाचे प्रस्ताव परत ऑनलाईन अर्ज आणि आता सोडत पद्धती  प्रक्रियेबाबत व कार्यालयातील संबंधित कर्मचारी बाबत तीव्र नाराजी प्रकट केली असून शेतीच्या ऐन हंगामात कृषी विभागाच्या अशा अडेलतट् कार्यशैली बद्दलही तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 तालुका कृषी विभागाच्या  अशा ढिसाळ कारभाराबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी वरिष्ठांकडे दाद मागण्याचे  ठरविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!