चिमुर शहरात चोरांचा धुमाकूळ

चिमुर शहरात चोरांचा धुमाकूळ

अंदाजे ३०,००० रु व एका मोबाईल सह मोबाईल चे डमी पीस गेले चोरी



चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - चिमुर तालुक्यातील नेरीतील भर दिवसा झालेल्या  चोरीची घटना ताजी असतानाच काल दिनांक.२४/०७/२०१९ रात्री ९:३० च्या दरम्यान प्रफुल बेत्तावार यांच्या मोबाईल चे दुकान  चे पाठीमागचे लोखंडी शेटर फोडून अंदाजे ३०,००० रु व एक मोबाईल सह मोबाईल चे डमी पीस अनेक कंपनीचे  चोरी गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मंगळवार दिवस दिनांक.२३ जुलै २०१९ ला रात्री प्रफुल बेत्तावार यांचे वडील हे आपली दुकान ०९:०० वाजताच्या सुमारास बंद करून घरी गेले असता चोरट्याने याच संधीचा फायदा घेत ०९:३० वाजताच्या सुमारास दुकानचा मागील दरवाजा फोडून दुकानात प्रवेश केला व दुकानात चमकत असलेले डमी मोबाईल पीस व आणि दिवसभर झालेल्या कमाईचे पैसे हे गल्यात ठेवलेले होते यात चोरट्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पैसे लंपास केले. सकाळी वेळेवर प्रफुल बेत्तावार आपल्या दुकानात आले असता हि घटना उघडकीस आली.नंतर या बाबत पोलिसांना माहीती मिळताच चिमूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार स्वप्निल धुळे व त्यांच्यासह पोलीसांनी दुकानात येऊन संपूर्ण घटनेचा पंचनामा केला.व या बाबत पुढील तपास चिमूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!