पोंभुर्णा पब्लिक स्कूल ला शासन मान्यता प्राप्त
पोंभुर्णा पब्लिक स्कूल ला शासन मान्यता प्राप्त
पोंभूर्णा (जवाहर धोंडरे)
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यिका शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम २०१२ अंतर्गत श्री. तिरुपती तिरूमला महीला बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर द्वारा संचालित पोंभुर्णा पब्लिक स्कूल, पोंभुर्णा या शाळेला सन २०१९ - २० या शैक्षणिक वर्षांपासून शासन मान्यता मिळाली असल्याचे कार्यकारी संचालक रमेश सातपुते यांनी पत्रकार परिषदेतून माहीती दिली.
सदर शाळेने मान्यतेचा प्रस्ताव दि. १४ जुन २०१७ ला शासनाकडे सादर केलेला होता. त्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक एसएफएस- १०१९/ प्र. क्र.३२९/ एसएम- २ मंत्रालय, मुंबई दि. २२ जुलै २०१९ अन्वये शासनाने परवानगी दिलेली आहे.
त्यामुळे सदर शाळेत प्राथमिक ते उच्च माध्यमिक, इ. १ ली ते १२ वी, सर्व शाखा, इंग्रजी माध्यमाचे अधिकृत वर्ग चालविणेकरिता मान्यता दिली असून येथे वर्ग १ ते ६ वा पर्यंत सुरू झाले असल्याने पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता निसंकोचपणे पाल्यांना शाळेत दाखल करावे. येथील विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याकरीता आम्ही सदैव कार्यरत असल्याचे कार्यकारी संचालक रमेश सातपुते यांनी विशद केले. पत्रकार परिषदेला प्राचार्य, शिक्षक- शिक्षिका यांची उपस्थिति होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!