पोंभूर्णा तालुका कुष्ठ भयमुक्त करणार"
पोंभूर्णा तालुका कुष्ठ भयमुक्त करणार"
कुष्ठांतेय अधिकार मंच सदस्यांचा निर्धार.
पोंभूर्णा (जवाहर धोंडरे)
- अलर्ट इंडिया मुंबई,व अवार्ड संस्था, नागभिड द्वारे विविध सामाजिक संस्था व व्यक्ती च्या सहभागाने गेल्या ३ वर्ष्यापासून पोंभूर्णा तालुक्यात कुष्ठरोगा विषयी माहिती, शिक्षण देऊन जनजागृतीचे कार्य करीत आहे. तसेच कुष्ठांतेयाचे मानवी हक्क व अधिकार याविषयी सक्षमीकरणाची प्रक्रिया सुरु असून कुष्ठांतेयांचे कुष्ठांतेयांनी कुष्ठांतेयांसाठी संघटना कुष्ठांतेय अधिकार मंच या नावाने काम करित असून या अधिकार मंचाला ब-या पैकी प्रतिसाद मिळत आहे. या मंचाची तालुका स्तरीय सभा पोंभूर्णा येथील वनविभागाचे विश्रामगृहात नुकतीच पार पडली.तालुका कुष्ठांतेय अधिकार मंचाचे डॉ.अमोल बावणे या सभेच्या अध्यक्ष स्थानी होते. पोंभूर्णा तालुका कुष्ठ भयमुक्त करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला . त्यासाठी कुष्ठांतेय अधिकार मंचात सहभागी सर्व कुष्ठांतेय आता आपल्या गावात गृह भेटी देऊन कुष्ठरोग संदर्भात माहिती देणार आहेत. नवीन कुष्ठरुग्ण शोधणार आहेत. विकृती आलेल्या कुष्ठांतेयांच्या भेटी घेऊन कुष्ठरोग संदर्भ सेवा मिळवून देणार आहे. तसेच शासकीय योजनांचा लाभ घ्यायला मदत करणार आहेत. ग्राम पंचायत ला भेट देऊन येत्या 15 ऑगष्टला स्वातंत्र्य दिनी ग्रामसभेत विषय चर्चेला आणून कुष्ठ "भयमुक्त ग्रामपंचायत" चा ठराव मंजूर करून घेण्यासाठी कुष्ठांतेय अधिकार मंच चे सर्व सदस्य प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर करणार कार्य करणार असल्याचे सभेत ठरविण्यात आले आहे. अशा प्रकारे समुदायात कार्य करून कुष्ठांतेय बांधवांना समाजात सन्मानाने, प्रतिष्ठेने जीवन जगता यावे अशी पोषक स्थिती निर्माण करण्यास कुष्ठांतेय अधिकार मंच कटिबद्ध असल्याचे मत अलर्ट इंडिया चे कार्यक्रम अधिकारी अभिजित कांबळे यांनी मार्गदर्शन करतांना विशद केले. या सभेत तालुका कुष्ठांतेय अधिकार मंचाचे सदस्य जवाहर धोडरे यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले. अवॉर्ड संस्था नागभीड चे सचिव गुणवंत वैद्य, अलर्ट इंडियाचे क्षेत्र समन्वयक मिलिंद बारसिंगे, समाज प्रवर्तक अर्चना उराडे, जितेंद्र मानकर,कुष्ठांतेय सक्षम समितीचे प्रतिनिधी रणजित कांबळे आणि सदस्य उपस्थित होते. सभेचे संचालन व आभार मिलिंद बारसिंगे यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!