वाट चुकलेल्या मूकबधीर मुलाला केले शिक्षकाच्या स्वाधीन वरोरा पोलिसांची स्तुत्य अशी हि कामगिरी
वाट चुकलेल्या मूकबधीर मुलाला केले शिक्षकाच्या स्वाधीन
वरोरा पोलिसांची स्तुत्य अशी हि कामगिरी
वरोरा - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - वाट चुकलेल्या शाळेकरी मुलगा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या नंतर तो काहीच बोलत नसल्याने पोलिसानं समोर यक्ष प्रश्न पडला शेवटी पोलीस मित्राच्या मदतीने त्याला शाळेतील शिक्षकांच्या स्वाधीन करण्यात आले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. मूकबधीर मुलाचे नाव जितेंद्र आदित्य परचाके (७) असे आहे. या प्रकरणात पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाची सर्वत्र स्तुती करण्यात येत आहे.
अधिक माहिती नुसार बाहेर गावातून शिक्षणासाठी आनंदवनातील मूकबधीर शाळेत नुकताच दाखल झालेला सात वर्षीय मुलगा शाळेची वाट चुकून वरोरा शहरातील रत्नमाला चौकात आला. ओळखीचे कुणीच दिसत नसल्यामुळे भांबावून गेलेला मुलगा अचानक ओ क्सा बोक्सा रडू लागला. त्याचे रडणे एकूण आजूबाजूच्या लोकांनी त्याची विचारपूस केली असता तो काही बोलत नव्हता. शेवटी तेथील सुज्ञ नागरिकांनी आपले कर्तव्य बजावत त्याला वरोरा पोलीस स्टेशन मध्ये आणून सोडले. पोलीस शिपाई ममता गेडाम व प्रीती बावणे यांनी त्या मुलाची विचारपूस केली असता तो काही बोलत नव्हता मुलगा घाबरून बोलण्याच्या बोलण्याच्या मनःस्थितीत नाही हे कळल्यावर ज्या जागेवर तो गवसला त्या जागेच्या आसपास त्याचे घर असावे असे गृहीत धरून महिला पोलीस शिपायांनी पोलीस मित्र लखन केशवानी याला बोलावून घेतले. पोलीस मित्राच्या सहाय्याने मुलाला घेऊन ते रत्नमला चौकात गेले.तीठेमुलाचे परिचित कोणी नसल्याने आनंदवन चौक व मार्केटमध्ये फिरवून पत्ता लावण्याचा प्रयत्न केला गेला जेणेकरून त्याला त्याच्या ओळखीचे नातेवाईक किंवा परीचीत भेटेल अथवा तो राहत असलेले ठिकाण सांगेन परंतु केवळ हावभाव करीत असल्यामुळे तो मुलगा मुका असल्याचे लक्षात आले. तेव्हा व्हॉट्स अॅप वर मुलाचा फोटो टाकण्यात आला.जेणे करून कुणी त्याला ओळखेल. मुलगा मुका असल्याने वरोरा आनंदवन येथे मूकबधिर मुलांसाठी एक शाळा आहे हे पोलीस मित्र लखन केशवा नी ल माहीत होते.म्हणून वेळ न दवडता पोलीस आणि पोलीस मित्र हे मुलाला घेऊन आनंदवनातील मूकबधिर शाळेत गेले. तिथे शिक्षकांना भेटल्यानंतर तो मुलगा मूकबधिर शाळेचाच असल्याचे निष्पन्न झाले. सात वर्षाचा जितेंद्र परचाके नुकताच तीन चार दिवसापूर्वी आनंदवनात शिकण्यासाठी दाखल झालेला आहे. नुकताच दाखल झाला असल्यामुळे त्याला इथल्या जागेबद्दलची परिपूर्ण कल्पना नव्हती. सकाळी शाळेत जात असताना बहुतेक तो वाट चुकला व नकळत तो वरोरा शहरात रस्त्याने रत्नमला चौकापर्यंत पोहचला. या दरम्यान ओळखीचे कोणी मुले न मिळालेले नाही तो भांबावून गेला. व आई बाबांची आठवण काढून रडत होता. पोलिसाच्या शर्तीच्या प्रयत्नाने अखेर जितेंद्र ला मूकबधिर शाळेतील शिक्षकांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलाला आपल्या नियोजित स्थानी पोहचवून पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. वेळेवर मुलाला योग्य मदत न मिळाल्यास मुलासोबत काही अघतीत घटना घडू शकली असती. सुज्ञ नागरिक, पोलिस मित्र व पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!